
गोविंद पवार उपसंपादक नांदेड
नांदेड / लोहा –
आपल्या लेखनीच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देणारे सामाजिक, शैक्षणिक राजकीय, धार्मिक, कृषी क्षेत्रासहीत आदी विविध विषयांवर उत्कृष्ट लेखन करणारे लोहा येथील प्रसिद्ध पत्रकार विलास सावळे यांना शिवा संघटनेच्या वतीने श्रीक्षेत्र कपिलधार येथे शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा मनोहर धोंडे सर व राज्याचे माजी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते एका शानदार सोहळ्यात शिवा राष्ट्रीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सदरील कार्यक्रमाला राज्याचे कृषिमंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे,शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, माजी मंत्री प्रा. सुरेश नवले, माजी आमदार बब्रुवान खंदाडे , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाचे मंगेश चिवटे यांच्यासह आदी मान्यवर व महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा येथील मोठ्या संख्येने शिवा संघटनेचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.