
तालुक्यात विविध विकास कामांचे उदघाटन आणि भूमिपूजन कार्यक्रम संपन्न…..
दैनीक चालु वार्ता
म्हसळा प्रतिनिधी अंगद कांबळे
म्हसळा – लोकसभा, विधानसभा, पंचायत समिती, जिल्हा परिषद या निवडणुका सोप्या असतात मात्र ग्रामपंचायत निवडणूक ही सर्वात अवघड निवडणूक असते कारण निवडणूक लढविणारे सर्वच उमेदवार हे आपल्या गावातील वाडीतील असतात त्यामुळे त्यातून
उमेदवार निवडून द्यायचा असतो त्यामुळे ही निवडणूक अवघड असते असे महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी म्हसळा तालुक्यातील विकास कामांचे उदघाटन,भूमिपूजन आणि नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांचा जाहीर सत्कार कार्यक्रमात प्रतिपादन केले यावेळी बोलताना त्या पुढे म्हणाल्या की, तालुक्यातील नुकत्याच पार पडलेल्या १२ ग्रामपंचायत पैकी 9 ग्रामपंचायती ह्या बिनविरोध करून त्याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्य बिनविरोध निवडून दिल्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे आणि मतदारांचे जाहीर आभार मानले तसेच काही ग्रामपंचायती मध्ये निवडणुका झाल्या होत्या त्यामध्ये सुद्धा मा सुनीलजी तटकरे ,आमदार अनिकेत भाई तटकरे आणि माझ्या फंडातून गावात झालेल्या विकास कामांची पोच पावती म्हणून सर्व सदस्यांसहित सरपंच आणि उपसरपंच निवडून दिलेत त्याबद्दल1सुद्धा सर्व ग्रामस्थांचे आणि मतदारांचे आभार व्यक्त केले
या तालुक्यातील प्रत्येक गावावर खासदार सुनील तटकरे यांनी प्रेम केले आहे प्रत्येक गावात वाडीत त्यांनी विकास कामे केली आहेत ग्रामस्थांनी निवेदन द्यावे आणि तटकरे साहेबानी ते काम मंजूर करावे एवढे विशेष लक्ष व प्रेम या तालुक्यातील गावांवर असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले तसेच या भागातील विकास कामांना निधीची कमतरता पडू देणार नाही या तालुक्यासह या ग्रामीण भागातील तटकरे परिवारावर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जो विश्वास दाखवला आहे तो विकास कामांच्या माध्यमातून सार्थ ठरवणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले यावेळी सकलप, तोंडसुरे, साळवींडे, वरवठणे कोंड, आगरवाडा, बनोटी,गणेश नगर येथील विविध विकासकामांचे उदघाटन आणि भूमिपूजन मंत्री अदिती तटकरे यांच5हस्ते करण्यात आले यावेळी या कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष समीर बनकर, जिल्हा चिटणीस महादेव पाटील,जिल्हा सभापती बबन मनवे
महिला तालुका अध्यक्ष मीना टिंगरे, माजी सभापती छाया म्हात्रे, माजी उपसभापती संदीप चाचले, मधुकर गायकर,सोनल घोले,रेश्मा कानसे,रियाज फकिह, महेश घोले, उदय महामुनकर,संदीप पाटील, वनिता खोत आदी मान्यवर पदाधिकारी आणि ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.