
दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड/कंधार – सिरसी बु ता.कंधार परीसरात एप्रिल २०२३ महिन्यात गारपिट व अतिवृष्टी होवुन शेतक-यांच्या पिकांचे व फळबागांचे खुप मोठे नुकसान झाले होते.नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेले अधिकारी व तलाठी यांनी गावात मोजक्याच शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली व काही शेतकऱ्यांना उडवा उडवीचे उत्तर देऊन नाव वगळले,शेतात नंतर येतो दोन दिवसांनी येतो आज काम आहे पायी चालु शकत नाही असे काहींना तर काहींना तुमचे नाव यादीत टाकलो आहे असे उल्लू बनवित नावे वगळली व शेतकऱ्यांना लाभापासुन वंचीत ठेवले आणि काहीचे नुकसान कमी व चुकीचे नोंद दाखवण्यात आली. काही शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी केली नाही अशाप्रकारे काही खरे शेतकरी गारपिट लाभापासुन वंचीत राहीले आहेत. लाभापासुन वंचीत राहीलेल्या शेतकऱ्यांना शासनाचे अनुदान मिळवून देण्यात यावे या मागणीसाठी दि. २८ नोव्हेंबर २०२३ पासुन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड कार्यालयासमोर उपोषणाला प्रारंभ करण्यात आला असून जोपर्यंत शेतकऱ्यांची अनुदानाची मागणी मंजूर होणार नाही तोपर्यंत उपोषणाहुन उठणार नाही असा इशारा सिरशी बु. येथील शेतकऱ्यांनी दिला आहे.उपोषणास जाधव व्यंकटी गोविंद,लोकडू गायकवाड, पांडुरंग जाधव,तोटवाड गणपत , मारोती जाधव,माधव जाधव तसेच सिरसी बी येथील बरेच शेतकरी आमरण उपोषणाला बसले आहेत.