
दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड/मुखेड:-इंदिरा गांधी श.वृ.निवृत्तीवेतन योजनेचा दि. १६/१२/२०२१ रोजी नरसाबाई श्यामसुंदर यरमुलवाड यांचा प्रस्ताव तहसिल कार्यालय मुखेड येथे सादर केलेला आहे.तहसिल कार्यालयातील स्थानिक कर्मचारी पा.जी.वारे हे मुद्दाम प्रस्ताव मंजूर करत नाहीत.असे शेकडो लोकांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत.पि.जी.वारे हे संजय गांधी निराधार योजना या शाखेत कारकून आहेत.लोकांचे प्रस्ताव मंजूर करत नाहीत व विचारना केली असता उडवाउडवीची उत्तरे देत असतात.याबद्दल ३ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शेकडो लोकांचे प्रस्ताव लवकरात लवकर तहसीलदार तथा तालुका दंडाधिकाऱ्यांनी चौकशी करून मंजूर करून द्यावी व तसेच त्या कर्मचाऱ्याची संजय गांधी निराधार योजना शाखेतून हकालपट्टी करण्याची मागणी माधव तानाजी देवकत्ते रा.वडार गल्ली,मुखेड ता.मुखेड,जि.नांदेड यांनी तहसीलदार साहेब मुखेड यांच्याकडे निवेदन देण्यात केली आहे.दोषीवर. कारवाई करून गरीब ,अनाथ निराधार वयोवृद्ध महिला, जेष्ठ नागरिक, दिव्यांग यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.