
सरकारने कुणा एकट्याच्या दबावाखाली येऊन मराठ्यांची दगाफटका करू नये…
अंबड प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंके
आम्ही ओबीसीतून आरक्षण घेणार आम्ही दंड आणि मांड्या थोपटल्या आहेत .आता तुम्हाला सुट्टी नाही. आरक्षण दिलं नाही तर गाठ मराठ्याशी आहे असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला . मनोज जरांगे पाटील यांच्या जालन्यात विराट सभा पार पडली. यावेळी त्यांनी सरकारला इशारा देण्या सोबतच छगन भुजबळावरही जोरदार हल्लाबोल केला.
तरी गाठ मराठ्यांची आहे…
राज्य सरकारने कुण्या एकट्याच्या दबावाखाली येऊन मराठ्यांशी दगाफटका केला तर सुट्टी देणार नाही 70 वर्षांपासून आमच्यावर अन्याय होतोय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी 24 डिसेंबर पर्यंत वेळ आहे 24 तारखेला सरसकट आरक्षण मिळालं नाही तर गाठ मराठ्यांची आहे असा इशाराही जरांगे पाटील यांनी यावेळी सरकारला दिला.
ओबीसी आरक्षणचा एकाच जातीचा फायदा…
जरांगे पुढे म्हणतात .ओबीसी आरक्षणाचा फायदा फक्त एका जातीला फायदा झाला आहे 2000 ते 2014 या काळात या व्यक्तीने 80% हिस्सा एकट्याने खाल्ला इतर 300 जातीने 20 टक्के मिळाला याला फक्त सभेला धनगर समाज लागतो. आम्ही त्यांना म्हणलो की धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर भूमिका जाहीर करा ते करत नाही.
भुजबळावर जाहीर टीका…
हे सगळ्यात वाया गेलेला मंत्री आहेत त्याच्या सांगण्यावरूनच आमच्या लोकांना अटक केले हिंगोलीत येऊन गप्पा पुण्यात खडे येतो आणि जातीवाद करतो घटनेच्या पदावर बसतो सरकार सोबत राहतो आणि महापुरुषांच्या जाती काढतो भारताला सर्वात कलंक लागलेला मंत्री म्हणजेच छगन भुजबळ आहे जाती-जातीत तेवढे निर्माण करणारा ओबीसी बांधव आणि मराठा बांधवांमध्ये दंगल घडविण्याचे काम करणारा सगळ्यात वाया गेलेला मंत्री म्हणजेच छगन भुजबळ अशी घणघणीत टीका जरांगे पाटील यावेळी केली
दोन दिवसात गुन्हे मागे घ्या…
लाठीच्या वर बोलताना मनोज जरांगे म्हणले की. आम्ही शांततेत आंदोलन करत असताना आमच्या आई बहिणीवर हल्ला झाला इतक्या निष्ठुर सरकार आम्ही कधीच पाहिलं नाही एकीकडे म्हणत की. आमच्यावर गुन्हे मागे घेणार दुसरीकडे आमच्या लोकांना अटक करतोय तीन महिन्यानंतर आमच्या लोकांना अटक केले सरकारला एक शेवटच्या विनंती आहे दोन तारखेला उद्या एक महिना पूर्ण होतोय दोन दिवसात अंतरवालीतील गुन्हे आणि एक महिन्यातील महाराष्ट्रातील मागे घ्या असं आवाहन त्यांनी यावेळी केले नारायण कुचेनाही आमचा गेम करायचा नाही?.. जंरागे पाटील
मनोज जरांगे यांनी नारायण कुचेवर देखील हल्लाबोल केला सरकारच्या शिष्ट मंडळात नारायण कुचे देखील होते छगन भुजबळ म्हणतो नारायण कुचेवर अन्याय होतो आहे कुचे रोज आमच्या सोबत बोलता आहेत मला लोक फिरू देत नाहीत मी तुमच्यासोबत येऊ का असे कुचे म्हणतात आणि तिकडे ओबीसीचा नेत्या सोबत कांड्या लावतता मराठ्यांना खुट्या मारू नका कुचे काड्या लावायचं काम करतात मी त्यांना खूप मानायचं असे जरांगे म्हणले नारायण कुचे यांना मला सांगितला बीडचे लोक धनंजय मुंडेना अडकवणार म्हणले. धनंजय मुंडेंना देखील मराठ्यांचा मतदान आहे. ते कोठे जाणार त्यांना देखील बघू नारायण कुचे यांनी आमचा गेम करू नाही नाहीतर ऊस तोडायला जावा लागेल. असा इशारा धनंजय मुंडे यांना दिला…