
प्रतिनिधि/राखी मोरे
दै.चालु वार्ता/पुणे
पुण्यात एमजे रोडवर मराठीत नसलेल्या पाट्या फोडून मनसेनं आक्रमक आंदोलन केलं आहे. सात ते आठ दुकानांच्या पाट्यांची तोडफोड करत ते पुढे टिळक रोड कडे निघाले. वीस ते पंचवीस गाड्यांवर मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी आक्रमक पद्धतीने दुकानाच्या पाट्या फोडण्यास सुरूवात केली. मनसेच्या अध्यक्षांनी महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार पत्र दिलं होतं. त्यानिंही महानगरपालिकेच्या वतीने जाहीर केलं होतं की पुण्यातील सर्व दुकानांच्या पाट्या मराठीत हव्या आहेत अन्यथा कारवाई करण्यात येईल. माञ महापालिकेकडून कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामूळे मनसेने हे आंदोलन सुरू केले अलका टॉकीज चौकात पोलिसांनी त्यांना आवर घातला. या आंदोलनात बऱ्याचशा महिलांचाही समावेश होता.सहा दिवसांपूर्वी सांगूनही कारवाई झाली नाही आम्ही फक्त ट्रेलर दाखवलाय जर ह्या पाट्या बदलल्या नाहीत तर भविष्यात पिक्चरही दाखवू असेही मनसेनं सांगितलं.