
दैनिक चालू वार्ता
कंधार तालुका ग्रा प्रतिनिधी अविनाश कदम
महाराष्ट्रामध्ये एक आणि एकाच नावाची चर्चा होत आहे ती म्हणजे जे अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले, प्रत्येकाच्या तोंडी एकच नाव असलेले मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील. मनोज जरांगे पाटील यांच्या महाराष्ट्रात सभा चालू आहेत. गाव म्हणू नका तालुका म्हणू नका जिल्हाही म्हणू नका सर्वत्रच लाखोंची गर्दी दिसून येत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या जरी मराठा आरक्षणासाठी सभा होत असल्या तरी ह्या व्यक्तीला पाहण्यासाठी बहुजन समाज देखील मैदानात गर्दी करीत आहे. मनोज जरांगे पाटील यांचा मराठवाडा 4था दौरा 1 ते 12 डिसेंबर दरम्यान असून महासभेचे आयोजन नांदेड जिल्ह्यातील भुईकोट किल्ला, दर्गा याने प्रसिद्ध तसेच मन्याडबहाद्दरांचा तालुका म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या कंधार तालुक्या मध्ये श्री शिवाजी हायस्कुल कंधार येथील मैदानावर हु. माणिकराव काळे रोड जवळ दि. 8 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 7 वाजता महासभेचे आयोजन कंधार-लोहा सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. यासाठी कंधार-लोहा सकल मराठा समाज हा जय्यत तयारीत आहे.