
आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या प्रयत्नांना यश…
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
नांदेड दक्षिण मतदार संघातील विविध विकास कामे पूर्ण करण्यासाठी आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या प्रयत्नातून पुरवणी अर्थसंकल्पात सुमारे 132 कोटी रुपयांच्या गोदावरी नावघाट व ग्रामीण भागातील रस्त्यांच्या विकासासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.
मंजूर झालेल्या या निधीतून न राष्ट्रीय महामार्ग 161-ए ते खूपसरवाडी विष्णुपूरी असर्जन राममा-161 बळीरामपुर राममा 161तुप्पा वडगाव ब्राह्मणवाडा पाथरड रेल्वे स्टेशन देगाव रस्त्याची सुधारणा करणे रामा 413 सा.क्रमांक.17/100 ते 25/00. 15 कोटी रुपयांची कामे केली जाणार आहेत. याशिवाय
नांदेड दक्षिण मतदारसंघात बाभुळगाव तुप्पा, भायगाव पिंपळगाव मिश्री पूनेगाव सिधनाथ,नागापूर,वांगी, वाडी पुयाड प्रमा – 10 वाजेगाव वडगाव पिंपळगाव मिष्री रस्त्याची सुधारणा करणे प्रजिमा 30 किमी 0/00 ते 6/00 सुधारणा करणे, 9 कोटी, पश्चिम वळण रस्त्यावरील गोदावरी नदीवरील पूल ते नदीकाठाने (वाजेगाव बंधर्यापर्यंत पोचमार्ग) येथे नदी घाट आणि रस्त्याचे सुशोभीकरण करणे,किमी 0/00 ते 6/00 रामा.-247 लिंक
100 कोटी, देगलुर नाका रोड (क्रेशर रोड)ते केळी मार्केट चौक (डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक.)बर्फी चौक ते दरबार मशीद किल्ला नाव घाट रस्त्याची दुरुस्ती सुधारणा करणे, प्ररामा -02 लिंक रोड क्र.3 किमी 0/00 ये 2/874.
5 कोटी, बाभुळगाव तूप्पा भायेगाव, पिंपळगाव पुनेगाव सिद्धनाथ नागापूर ,वांगी,वाडी पूयड, प्रमा -10 वाजेगाव,वडगाव रस्त्याची सुधारणा करणे,30 किमी 27/900 ते 27/700, 29/700 ते 30/300 सुधारणा करणे 3 कोटी रुपयांच्या कामांच्या समावेश आहे
वरील रस्त्याच्या विकास कामासाठी आमदार मोहनराव हंबर्डे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
त्यामुळे राज्य शासनाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पुरवणी बजेट मध्ये या रस्त्यांच्या कामांना निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे,
त्यामुळे स्थानिक जनतेत आनंदाचे व उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे,
त्यामुळे अनेकांनी नांदेड दक्षिण मतदार संघातील विकास प्रिय आमदार मोहनराव हंबर्डे यांना धनयवाद देऊन त्यांचे आभार मानले आहेत.