
कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचे सकल मराठा समाजाचे आव्हान…
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
नांदेड / लोहा : – कंधार तालुक्यातील शिवाजी काॅलेजच्या मैदानावर मनोज पाटील जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या भव्य दिव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. तर लोहा तालुक्यातील चोंडी येथील मराठा आरक्षणासाठी चळवळीत असणारे सक्रिय मराठा बांधव सदरील सभेसाठी चोंडी येथील मराठा समाज बांधवांचा निधी घेऊन कंधारकडे जात असताना घोडज जवळील बाळंतवाडी परीसरात अपघाती मृत्यू झाला.
चोंडी येथील बालाजी नारायणराव जाधव हे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सतत दिवसरात्र मेहनत करत होते गावातील मंडळींकडून सभेसाठी निधी गोळा करून घेऊन जात असताना काळा घात केला व त्यांचे अपघाती निधन झाले असुन त्यांचा कुटुंबायांना मदत म्हणून सहकार्य करावे. असे आव्हान सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत आहे. चि.नारायण बालाजी जाधव फोन पे / गुगल पे 7066690380 नाव : नारायण बालाजी जाधव Account No – 105311111124192 IFSC Code : UTI0SNDCC1Branch code:1053 नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक माळाकोळी सदरील खात्यावर कुटुंबास अर्थीक मदत करण्याचे आव्हान करण्यात येत आहे.