
माळेगांव यात्रा नियोजन बद्ध करांनी – मुख्यकार्यकारी अधिकारी मिनल करणवाल…
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
नांदेड / लोहा : –
दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा असलेल्या श्री. क्षेत्र खंडोबा देवस्थान माळेगांव यात्रेनिमित्त पुर्व नियोजन आढावा घेण्यासाठी मुख्यकार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी पंचायत समिती कार्यालयात बैठक घेतली लोहा शहराच्या परंपरेनुसार खारीक खोबऱ्याचा हार व खंडोबाची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. माळेगांव यात्रेचे पुर्व नियोजन व येणाऱ्या अडीअडचणी जाणून घेतल्या.
लोहा पंचायत समिती कार्यालयात ६ डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती लोहा यांच्या नियोनाखाली दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून पाहिल्या जाणाऱ्या श्री. क्षेत्र खंडोबा देवस्थान माळेगांव यात्रेनिमित्त पंचायत समिती कार्यालयात तालुक्यातील सर्व विभाग प्रमुखांचा पुर्व नियोजन आढावा बैठक घेतली. माळेगांव येथे जाऊन यात्रा परिसराची पाहणी केली. यात्रेनिमित्त पुर्व नियोजन व येणाऱ्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यात्रेमध्ये लाईटची कमतरता भासू नये, पिण्याच्या व सांडपाण्याचे योग्य नियोजन, आरोग्य, कृषी, महिला बालकल्याण या सर्व विभाग प्रमुखांनी यात्रा नियोजन बद्ध करुन यात्रेकरुंना प्रशासनाच्या वतीने सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा सुचेना दिल्या.
या आढावा बैठकीस उपस्थित उपविभागीय अधिकारी डॉ.शरद मंडलिक, उपविभागीय पोलिस अधिकारी मारोती थोरात, उपमुख्यकार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे, तहसीलदार शंकर लाड, गटविकास अधिकारी दशरथ आडेराघो जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व विभाग प्रमुख उपस्थिती होते.