
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी प्रवीण पवार दौंड
दौंड, दि .10 : दौंड येथील स्वतंत्र (प्रांत)कार्यालयाचे उद्घाटन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांच्या हस्ते झाले. दौंड तालुक्यातील मागण्यांवर विचार करून तालुक्याच्या विकासासाठी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन त्यांनी उद्घाटनानंतर झालेल्या शेतकरी मेळाव्यात केले. (प्रांत) कार्यालय उद्घाटन, तालुका क्रीडा संकुलातील जॉगिंग ट्रॅकचे लोकार्पण, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या नवीन बांधण्यात येणाऱ्या इमारतीची भूमिपूजन, दौंड – गोपाळवाडी रस्त्याचे भूमिपूजन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार जयकुमार गोरे यांनी आमदार ॲड .राहुल कुल यांची प्रशंसा केली आणि त्यांच्या पाठपुराव्यामुळे दौंडला प्रांत कार्यालय आणि विविध योजना आणता आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी खासदार रणजीत सिंग नाईक निंबाळकर, यांनीही आमदार ॲड .राहुल कुल यांच्या कामाची स्तुती केली. या कार्यक्रमाला जयकुमार गोरे, अप्पर जिल्हाधिकारी अजय मोरे, उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार अरुण शेलार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया,नंदू पवार,माजी नगराध्यक्ष शितल कटारिया आदी उपस्थित होते तालुक्यातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.