
दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे (इंदापूर):ग्रामपंचायत शेटफळ (हवेली) यांचे विद्यमाने व द ब्रिलियंट हेल्थ अँन्ड अँग्री संस्था अंतर्गत सखी महिला कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र यांचे सहकार्याने मोफत मसाले उद्योग प्रशिक्षण व सोप मेकिंग प्रशिक्षण, अगरबत्ती उद्योग प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.या प्रशिक्षणामध्ये गावातील सुमारे ५२ महिलांनी सहभाग घेतला होता. प्रशिक्षण काळात महिलांना स्वतः मसालाचे प्रात्यशिक करायला शिकवले.प्रशिक्षण बरोबर व्यवसाय मार्गदर्शन, कच्चा माल, बाजारपेठ, मार्केटिंग ची माहिती देऊन प्रशिक्षण पूर्ण केले. व प्रशिक्षण अंती महिलांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली.
हे प्रशिक्षण सलग ५ दिवस घेण्यात आले, शेवटच्या दिवशी शेटफळ हवेली ग्रामपंचायतच्या सरपंच रूपाली पवार व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. व प्रशिक्षणार्थी महिलांनी एकत्र येऊन भोजनाचा आस्वाद घेतला.
कार्यक्रमात महिलांनी मनोगत व्यक्त करत असताना गावातील महिलांना मोफत प्रशिक्षणाची सोय उपलब्ध केल्याने सरपंच यांचेही आभार मानले.व महिलांनीही एकत्र येऊन मसाले उद्योग व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला त्या वेळी सरपंच यांनी मार्केटिंग साठी मदत करू . महिलांनी उद्योग व्यवसाय केल्यास आपल्या गावाचे नाव निघेल.मसाले उद्योग चालू करताना एखाद्या उद्योग कंपनी पाहण्याचे नियोजन करू असे आश्वासन दिले.
हे प्रशिक्षण संस्थेच्या अध्यक्षा मनिषा शिंदे , व संस्था समन्वयक प्रताप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रशिक्षिका कोकाटे मॅडम यांनी राबविले.