
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
लोहा / पेनुर : – लोहा तालुक्यातील पेनुर येथील कै विठ्ठलराव लबडे यांच्या दहाव्या पुण्यस्मरण निमित्त एक दिवसीय भव्य किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सदरील कार्यक्रमात दिनांक २२/१२/२०२३ शुक्रवारी सकाळी ११ ते १ या वेळेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार श्री ह भ प शंकर महाराज लोंढे सोनमांजरीकर यांचे हरी किर्तन होणार आहे. या पुण्यस्मरण सोहळ्याला उपस्थित रहाण्याची विनंती गोविंदराव पा लबडे , आप्पाराव पा लबडे , रामदास पा लबडे , शिवाजी पा लबडे यांनी केली आहे.