
भाजप युवा शहर व ग्रामीणच्या वतीने अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) :काँग्रेसचे आमदार बळवंत वानखडे यांचे पुतणे तसेच युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव नितेश श्रीकृष्ण वानखडे यांना जातीय तेढ निर्माण करून समस्त हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याच्या आरोपावरून तात्काळ अटक करण्याची मागणी अंजनगाव सुर्जी भाजप युवा शहर व ग्रामीणच्या वतीने करण्यात आली आहे.
तथाकथित धर्मनिरपेक्ष वादाच्या खोट्या आडून सातत्याने हिंदुविरोधी भूमिका घेणारे आणि काँग्रेसचे आमदार आणि प्रदेश सचिव यांनी अत्यंत आक्षेपार्ह आणि खालच्या पातळीवरील विधान केले आहे.शिव महापुराण वक्ते प्रदीप कुमारजी मिश्रा यांच्या श्री शिव महापुराण कथेबाबत देश-विदेशातील अत्यंत अवमानकारक वक्तव्यामुळे कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
या दोन्ही विधानांचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करतो.जातीय तेढ निर्माण करून संपूर्ण हिंदू समाजाच्या भावना दुखावणाऱ्या राष्ट्रविघातक शाब्दिक नायकांना तात्काळ अटक करण्यात यावी,अन्यथा आम्ही जिल्हाव्यापी आंदोलन करू अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने यावेळी करण्यात आली.
राष्ट्रविघातक काका-पुतण्याला तात्काळ अटक करून गुन्हा दाखल करण्याचे निवेदन पोलीस स्टेशन अंजनगाव सुर्जी येथे देतेवेळी रवी गोळे (तालुकाअध्यक्ष,भाजपा),
प्रियंका मालठाणे (जिल्हासचिव,भाजपा),
भुषण काळमेघ (जिल्हामहामंत्री,भाजयुमो),
सौरभ काळमेघ (तालुकाअध्यक्ष,भाजयुमो),
गौरव चांदुरकर (शहरअध्यक्ष,भाजयुमो),
सागर बारब्दे (जिल्हाउपाध्यक्ष,भाजयुमो),
निखिल श्रीवास्तव (जिल्हासचिव,भाजयुमो),
मनीष मेन, विद्या घडेकार, हेमलता लेंधे, निताताई बोचरे,शिलाताई सगणे, मनोज श्रीवास्तव, आशिष टिपरे, संतोष वर्मा, विजय धुमाळे, सुभाष थोरात,मनोहर भावे, विनोद दुर्गे, योगेश दवे, निलेश पाटील,राजेश बांगर, ऋतिक शर्मा, स्वप्नील घोगरे, राहुल पंड, रवी बचे, श्याम गुजर, सिद्धांत श्रीवास्तव, यश शाहू, रूपेश बुंदिले, मनोज निंबोकर, सुरज मुरकुटे,सोमेश खंडेतोड, सुयश राऊत, नितीन त्रिवेदी, अनुप शेरकर, संजय शर्मा,आशिष वानखडे, प्रविण काळे, मोहन आढाऊ,प्रतीक ठाकरे, राहुल ढोले, रोशन घोगरे, राजेश भदे, मोहन निचळ, शुभम रेचे, उमेश इंगळे, अनुप शेरकर, नागेश्वर मते, धीरज धुळे, नितीन वानखडे, राम भांगे आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.