प्रारूप मतदार याद्यांमधील घोळ संपता संपेना; माहितीच्या अधिकारातूनही धक्कादायक बाब समोर…
राज्यात सर्वत्रसध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळीसुरुआहे. तरहिनिवडणूकस्थानिककार्यकर्तेआणि पधाधिकाऱ्यांची असली तरी उच्च पदस्थ नेतेही आता मैदानात उतरल्याचे चित्र आहे . तर दुसरीकडे मातर प्रारूप मतदार याद्यां मधील घोळ संपता संपत नसल्याचे चित्र आहे . याच मुद्दयांवरून विरोधकांकडून आरोपांची सरबत्ती सुरु असून या प्रारूप मतदार याद्यां रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे . तर दुसरीकडे मुंबईतील प्रारूप मतदार याद्यां संदर्भात माहितीच्या अधिकारातून ही धक्का दायक बाब उघड झाली आहे. मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार याद्यांवरून अनेक आरोप होत आहे.
त्यातच काही भागातील मतदारांचे थेट वार्ड बदलले गेल्याची बाब माहिती अधिकारातून समोर आलीआहे.
कुर्ला परिसरातील तब्बल सात हजाराच्या जवळ अधिक मतदार हे दुसऱ्या वॉर्डात गेल्याची बाब ही आरटीआय कार्यकत्यांनी समोर आणली आहे. कुर्ला एल वॉर्ड मधील 6, 834 मतदारांचे चुकीच्या प्रभागात वर्गीकरण करण्यातआलेआहे. तरयाप्रकरणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी हियादी दुरुस्तीची मागणी केली आहे. पुढेआलेल्या माहितीनुसार, वार्ड क्रमांक 163 मध्ये दाखविण्यात आलेले एकूण 6,834 मतदार प्रत्यक्षात वार्ड क्रमांक 162 मध्ये येतात. तर प्रभाग रचना बदलानुसार (Delimitation), पुढील लिस्ट पार्ट्स 162 प्रभागात वर्गीकृत होणे अपेक्षित होते, परंतु मसुदा यादीत त्यांचे चुकीचे मॅपिंग झाले आहे.
चुकीचे वर्गीकृत लिस्ट पार्ट्स व मतदार संख्या :
लिस्ट पार्ट 247 → 1,454 मतदार (सीरियल 1634-3087)
लिस्ट पार्ट 248 → 1,343 मतदार (सीरियल 3088-4430)
लिस्ट पार्ट 249 → 1,157 मतदार (सीरियल 4431-5587)
लिस्ट पार्ट 250 → 1,285 मतदार (सीरियल 5588-6872)
लिस्ट पार्ट 251 → 799 मतदार (सीरियल 6873-7671)
लिस्ट पार्ट 252 → 796 मतदार (सीरियल 7672-8467)
या संदर्भातील निवेदन सहाय्यक आयुक्त, एल वॉर्ड यांना देण्यात आले असून त्याची प्रत महानगर आयुक्त भूषण गगरानी आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांना ही पाठविण्यात आली आहे.
Nashik: नाशिक महापालिकेच्या प्रारूप मतदार याद्या रद्द करण्याची काँग्रेसची मागणी
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्यानंतर नाशिक मधल्या अनेक भागांमध्ये प्रारूप मतदार याद्यांवर हरकती नोंदवण्यात आलेले आहे. यामध्ये सर्वच पक्षांकडून या हरकतींची लेखी पत्र प्रशासनाला देण्यात आलेले आहे. महायुतीतील शिंदे गटाकडून देखील थेट आरोप हा भाजपवर करण्यात आलेला होता आणि आता त्यानंतर काँग्रेसने देखील मतदार याद्यांमधील घोळ नसून हा भाजपने केलेला भ्रष्टाचार असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे. महापालिकेच्या प्रारूप मतदार याद्या रद्द कराव्या आणि या संपूर्ण मतदार यादीतील विसंगती दूर करून निवडणुका घ्याव्या अन्यथा भाजपकडे सत्तेच्या चाव्या येण्यासाठी अनेक मतदारांचा मतदानाचा हक्क भाजपकडून हिरावला जात आहे, असा थेट आरोप करत हा भ्रष्टाचार भाजपकडून सुरू असल्याचं नाशिक काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी म्हटल आहे.
