भाजप आमदाराचं धक्कादायक वक्तव्य !
बुलढाण्यातील मलकापूर नगर परिषदेसाठी तिहेरी लढतीचे चित्र आता स्पष्ट झाल आहे. मलकापूर नगर परिषदेसाठी काँग्रेस, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये तिहेरी लढत होणार आहे.
गेल्याशनिवारी (29 नोव्हेंबर) अजित पवारांनी मलकापूर येथे आपल्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा घेतली. तर काल (रविवारी) भाजप आमदार चैनसुख संचेती यांनी मलकापूर येथे सभाघेतली. या सभेदरम्यान आमदार चैनसुख संचेती यांनीएकखळबळजनकदावाकेलाआहे.
यावेळीतेम्हणाले की, मी 25 वर्षांपासून आमदार आहे. मला समजतं कोण कुणाला मतदान करत आहे. त्या मशीनसारखं अभ्यास करण्याचं मला सर्व ज्ञान आहे. शिवाय कुणी कुणाला मतं टाकली आहे, हे जर कुणाला बारकाईने समजत असेल तर ते फक्त आणि फक्त या मतदारसंघाचा आमदार चैनसुख संचेतीला समजतं. असेवक्तव्यत्यांनीकेलंआहे.
मी 25 वर्षांपासून आमदार, मशीनसारखं अभ्यास करण्याचं मला सर्व ज्ञान
पुढे आमदार चैनसुख संचेती म्हणालेकि, कालच अजितदादांनी म्हटल आहे की… सब कमल चलाओ और पुरी ताकत के साथ…! यावेळी त्यांनी असंही म्हटलं आहे की, मी 25 वर्षांपासून आमदार आहे, मला समजतं कोण कुणाला मतदान करत आहे, त्या मशीनसारखं अभ्यास करण्याचं मला सर्व ज्ञान आहे. कोण कुणाला मतदान करतो. हे मला सगळं समजतं. कुणी मतं कुणाला टाकली आहे… हे जर कुणाला बारकाईने समजत असेल तर ते फक्त आणि फक्त या मतदारसंघाचा आमदार चैनसुख संचेतीला समजतं. चैनसुख संचेती यांच्या या विधानामुळे मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
तडीपार, गुटखा माफीयांच्या हातात तुम्ही सत्ता देणार आहात का?
दरम्यान, पुढेत्यांनी नाव न घेता त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांना तडीपार, गुटखा माफिया असही संबोधलंय. अशा तडीपार आणि गुटखा माफीयांच्या हातात तुम्ही सत्ता देणार आहात का? असा सवालही यावेळी त्यांनी मतदारांना केला. कोण कुणाला मतदान करतो. मशीन इतकं ज्ञान मला असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. त्यामुळेएकीकडेईव्हीएममशीनआणिबोगसमतदारयाद्यांचावादसुरुअसतानासत्तेतील आमदाराच्यायावक्त्यव्यानेराजकीयवर्तुळातमोठीखळबळउडालीआहे.
