
महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिवाने केले पंडित श्री प्रदीपजी मिश्रा व पाटील समाजावर बेताल वक्तव्य
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (दर्यापुर) : स्वतःला सुशिक्षित समजुन नावा पुढे इंजिनिअर लावणारे महाराष्ट्र युवक काँग्रेस चे प्रदेश सचिव व दर्यापूर मतदारसंघाचे काँग्रेस पार्टीचे आमदार बळवंत वानखडे यांचे पुतणे नितेश वानखडे यांनी सनातन हिंदू धर्माचे प्रचारक व अंतरराष्ट्रीय कथावाचक पंडित श्री प्रदीपजी मिश्रा व पाटील समाजावर बेताल वक्तव्य केले आहे.याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतिने पोलीस स्टेशन दर्यापूर व अंजनगाव सुर्जी येथे निवेदन देऊन नितेश वानखडे यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.श्री शिव महापुराण हे संपूर्ण सनातन हिंदू धर्माचे त्यावर बेताल वक्तव्य करणे चुकीचे आणि हिंदू धर्माचा अपमान करणे ही काँग्रेसची संस्कृतीच झाली आहे असे भाजप दर्यापूर विधानसभा प्रमुख गोपाल चंदन यांनी म्हटले.
त्याप्रसंगी दर्यापूर पोलीस स्टेशन येथे जिल्हा उपाध्यक्ष बाबाराव पाटील बारवट दर्यापूर विधानसभा प्रमुख गोपाल चंदन,माजी आमदार रमेश बुंदीले, मदनराव बायस्कर, रवींद्र ढोकणे, विजय मेंढे, स्वप्नील गावंडे, अरविंद पावडे, संजय गुल्हाने, राम ठाकरे, सागर लाजूरकर तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.