दै.चालु वार्ता
उस्माननगर प्रतिनिधी लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- सिध्दार्थ एज्युकेशन सोसायटी संचलित सम्राट अशोक प्राथमिक शाळा उस्माननगर ता.कंधार येथे दि.२९ डिसेंबर रोजी ज्ञानाबरोबरच व्यवहारांचे ज्ञान समजावे म्हणून आनंदनगरी उत्साहात साजरी करण्यात आली.
सम्राट अशोक प्राथमिक शाळेत सकाळ पासून शाळेत विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे स्टॉल्स ( दुकाने ) लावण्यात आले होते.मुख्याध्यापक राहुल सोनसळे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेंत आनंदनगरी चे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्याना शाळेत शिक्षणा बरोबरच मैदानावर कवायत , शारीरिक ज्ञान , स्पर्धा परीक्षा , घेण्यात येतात.२१ व्या शतकात विद्यार्थ्यांना शिक्षण महत्त्वाचा घटक बनला आहे.दिवसभर शिकवणी, रात्री होमवर्क (अभ्यास) यामुळे विद्यार्थी अभ्यासात सतत मग्न राहतात म्हणून विद्यार्थ्यांच्या शरीराना (व्यायाम ) कसरत करायला हवी म्हणून शाळेत एक तास पिटी शिकवले जाते.२९ डिसेंबर रोजी अभ्यासाबरोबर व्यवहारांचे ज्ञान असावे म्हणून शाळेत आनंदनगरी घेण्यात आली.यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे स्टॉल्स दुकाने थाटून पालकांना , शिक्षकांना,आपल्या कडे आकर्षित केले होते. विद्यार्थ्यांनी भरपूर असा गल्ला जमा केला होता.शाळेत आनंदनगरी मधील साहीत्य ,खानावळ खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली होती.यावेळी सहशिक्षक, सहशिक्षिका यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे व शिक्षक ,शिक्षिका आणि विद्यार्थ्यांनी ,विद्यार्थ्यी व विद्यार्थ्यांचे पालक हे दुकानाखाद्यपदार्थ घेण्यात मग्न होते.
