
आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या प्रयत्नांना यश…
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
लोहा – कंधार मतदारसंघातील हजारो हेक्टर मधील खरीप हंगाम 2023 मध्ये सोयाबीन पिकावर पिवळा मोझेक रोगाची बाधा झाल्याने मतदारसंघातील सोयाबीन पिकाचे हजारो हेक्टर क्षेत्राचे अतोनात नुकसान झाले होते यामुळे मतदार संघातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या प्रचंड हवालदिल झाला असताना लोहा-कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी नोव्हेंबर 2023 मध्ये नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत सह मंत्रालय स्तरावर सोयाबीन बाधित शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत मिळावी म्हणून वेळोवेळी पाठपुरावा करून मतदारसंघातील सोयाबीनवरील पिवळ्या मोझेक बाधित शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत करण्याची मागणी लोहा-कंधार मतदारसंघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी वेळोवेळी तळमळीने केली होती, काल दि.०७ जानेवारी रोजी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये सोयाबीन वरील पिवळा मोझेक बाधित शेतकऱ्यांचा मुद्दा आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी लावून धरल्यानंतर नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मतदारसंघातील सोयाबीन वरील पिवळा मोझेक बाधित शेतकऱ्यांना 78 कोटी रुपये विमा निधी मंजूर केला असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आमदार श्यामसुंदर शिंदे यांना सांगितले, आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या वेळोवेळी तळमळीच्या पाठपुराला यश आले असून मतदारसंघातील सोयाबीन वरील पिवळा मोझेक बाधित शेतकऱ्यांना आमदार शिंदे यांच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार शिंदे यांनी पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांच्याकडे माळेगाव यात्रेचे भव्य स्वरूप पाहता जिल्हा परिषद नांदेड चा निधी कमी पडत असून डीपीडीसीच्या माध्यमातून माळेगाव यात्रेसाठी एक कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्याची मागणी आमदार शिंदे यांनी पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांच्याकडे केली असता पालकमंत्री महाजन यांनी एक कोटी रुपयांचा निधी यापुढे माळेगाव यात्रेसाठी राखीव राहणार असल्याची ग्वाही पालकमंत्री यांनी आमदार शिंदे यांना दिली असल्याने माळेगाव यात्रेला यापुढे आमदार शामसुंदर शिंदे यांच्या माध्यमातून वैभव मिळणार आहे. मतदारसंघातील अनेक गावात स्मशानभूमीचा प्रश्न जटिल असल्याचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी बैठकीत सांगून मतदारसंघातील अनेक गावात स्मशानभूमी नाहीच तर काही जागी जाळ्या नाहीत तर काही स्मशानभूमीला स्लॅप व कंपाऊंड नसल्याचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी बैठकीत सांगितल्यानंतर मतदारसंघातील सर्व गावातील स्मशानभूमी या अद्यावत करण्यासाठी निधीची कमतरता भासणार नसून मतदारसंघातील स्मशानभूमीसाठी भरीव निधी उपलब्ध करून देणार असल्याचे पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांनी आमदार शिंदे यांना आश्वासन दिले आहे. मतदारसंघातील वीज, कृषी, शिक्षण,सह अनेक विषयावर आमदार शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आवाज उठविला आहे, खरीप हंगामातील सोयाबीन पिकावर पडलेल्या पिवळा मोझेक बाधित शेतकऱ्यांना 78 कोटींची भरीव मदत लोहा कंधार मतदारसंघातील शेतकरी बांधवांना वेळोवेळी तळमळीने पाठपुरावा करून मिळवून दिल्याबद्दल लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांचे मतदारसंघातील सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने अभिनंदन व कौतूक होत असून निसर्गाच्या सततच्या लहरीपणामुळे लोहा कंधार मतदारसंघातील शेतकरी बांधव आर्थिक दृष्ट्या मेटाकूटीला आला असता मतदारसंघातील शेतकरी बांधवांना 78 कोटी रुपयांची भरीव आर्थिक मदत मिळवून दिल्याबद्दल लोहा कंधार मतदार संघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांचे मतदारसंघातील सर्व शेतकरी बांधवातून कौतुक व अभिनंदन होत आहे, हा 78 कोटीचा सर्वाधिक निधी नांदेड जिल्ह्यातील लोहा व कंधार तालुक्याला आमदार शिंदे यांच्या सततच्या तळमळीच्या पाठपुराव्यामुळे मिळाला असल्याने मतदारसंघातील शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे.