
दैनिक चालु वार्ता
बीड प्रतिनिधी किशोर फड
“विद्युत काम करताना प्रत्येकाने काळजीपूर्वक सुरक्षा साधनांचा वापर करावा”- प्रशिक्षक डि.बी.हातकंगने सर
बीड, अंबाजोगाई, लातूर, नांदेड, संभाजीनगर येथील महावितरण विभागातील तंत्रज्ञ, वरिष्ठ तंत्रज्ञ, प्रधान-तंत्रज्ञ यांचे विद्युत अपघात टाळण्यासाठी
संभाजीनगर येथे 9 जानेवारी ते 12 जानेवारी दरम्यान महावितरण प्रशिक्षण केंद्रा मार्फत प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे .
प्रशिक्षणात बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, नांदेड , छत्रपती संभाजीनगर, लातूर विभागातील तंत्रज्ञ बांधव उपस्थित आहेत. सदर प्रशिक्षण हे विद्युत अपघात कसे टाळता येतील ते कशामुळे होतात या विषयावर सविस्तर विस्तृत माहिती वेगवेगळ्या विषयात पारंगत असलेले अधिकारी सांगतात सदर प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री पेन्सिलवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण शिबिर पार पडत आहे सदर शिबिरात विद्युत कायदा त्याचे नियम, नियमावली सविस्तर माहिती समजावून सांगण्यासाठी उपकार्यकारी अभियंता श्री गडलिंग साहेब, विद्युत क्षेत्रात काम करताना यंत्रचालकांकडून परमिट कसे घ्यावे त्यावर कार्य कसे करावे यावर विस्तृत माहिती श्री डी बी हातकंगने सरांनी दिली व विद्युत अपघात होऊ नये म्हणून सर्वांनी अत्यावश्यक सुरक्षा साधनांचा वापर करावा असे आव्हान हातकंगने सरांनी केले.