
दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे (इंदापूर ):माळी महासंघाचे पुणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष विकास शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर शहरातील विविध ठिकाणी भैरवनाथ प्रतिष्ठान व माळी महासंघ यांच्या वतीने आयुष्यमान भारत कार्डचे मोफत वाटप करण्यात आले. तसेच वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.त्याच बरोबर महिलांना सत्यशोधक हा मराठी चित्रपट मोफत दाखविण्यात येणार आहे.
विकास शिंदे यांनी आजपर्यंत अनेक सर्व सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत.त्यांनी वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, स्वच्छता अभियान वृद्धाश्रमामध्ये अन्नधान्य वाटप, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप आजपर्यंत अनेकदा केले आहे.त्यांचा खुप मनमिळाऊ स्वभाव, आणि सामाजिक कामाची धडपड असते, युवक वर्गाबरोबरच वयोवृद्ध माणसांमध्येही त्यांचा नेहमी आदर केला जातो.