
दै.चालु वार्ता
कुरूळा प्रतिनिधी वैजनाथ गिरी
नांदेड/कंधार :-सनराईज एज्युकेशन सोसायटी संचलित इन्सपायर अबॅकस अकॅडमी पुणे यांच्या कडून राष्ट्रीय स्तरावरील गणित स्पर्धा व बक्षीस वितरण श्री संत नामदेव महाराज मंगल कार्यालय कंधार येथे दिनांक ७ जानेवारी रोजी पार पडले.या स्पर्धेत राज्यभरातून ५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.यात क्षितिज अविनाश कंधारकर या बालकाने सदरील स्पर्धेत ५ मिनिटा मध्ये १३५ बेरीज गणिते सोडवून त्याच्या गटामध्ये प्रथम श्रेणीचा चॅम्पियन ट्रॉफी पटकावले आहे.
तसेच कुमारी समीक्षा विनोद कांबळे या विद्यार्थ्यांनीने ५ मिनिटात मध्ये १९९ गुणाकार गणिते सोडवून चॅम्पियन ट्रॉफी मिळविले. विशेष बक्षीस स्मार्ट घड्याळ मिळवली.या दोन्ही विद्यार्थ्याचे विविध स्तरावरून अभिनंदन व कौतुक होत आहे. या स्पर्धेचे आयोजन इंस्पायर अबॅकस अकॅडमी कंधार च्या संचालिका सौ.अश्विनी गोंड (देशमुख)मॅडम यांनी कंधार येथे लहान मुलांच्या गणितामध्ये वाव मिळावे म्हणून आयोजन केले होते.या स्पर्धेच्या व बक्षीस वितरण समारंभाचे अध्यक्षा पानभोसी येथील सरपंच सौ.राजश्री मनोहर भोसीकर या होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटक शंतनु कैलासे हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. वर्षाताई संजय भोसीकर, सेवानिवृत्त कृषी अधिकारी विश्वंभरराव मंगनाळे, शासकीय गुत्तेदार वैजनाथ सादलापुरे ,इंस्पायर अबॅकस अकॅडमी कंधार च्या संचालिका सौ.अश्विनी गोंड (देशमुख) यांसह विद्यार्थी,पालक व आदी मान्यवर उपस्थित होते.
वरांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले.