
दै.चालु वार्ता
कुरूळा प्रतिनिधी वैजनाथ गिरी
नांदेड/कंधार :-कुरुळा येथील श्री संत सावतामाळी महाराज मंदिराच्या बाजुस सभा मंडप बांधकामासाठी नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव पाटिल चिखलीकर यांच्याकडून सात लाख रुपयाच्या निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसे पत्र माननिय जिल्हाधिकारी यांना देण्यात आले अशी माहिती कुरुळा येथील ग्रा.पं.सदस्य बालाजी पवळे यांनी दैनिक चालु वार्ताच्या प्रतिनिधीला दिली.श्री संत सावतामाळी महाराज यांच्या मंदिराच्या बाजुला सभा मंडपाचे बांधकाम व्हावे अशी मागणी गावकऱ्यांची खुप दिवसांची होती. ती मागणी मंजुर झाल्याने मंदिराचे विश्वस्त
मंडळात,समाज बांधवात तसेच गावकऱ्यांच्या मनात आनंदाची भावना निर्माण झाली आहे. मंजुर काम लवकरच सुरू होणार आहे.अशी माहिती बालाजी पवळे यांनी दिली.