
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती श्रीकांत नाथे
अमरावती अंजनीग्राम श्री मठ पिठाधिश्वर प.पू.आचार्य जितेंद्रनाथ महाराज १७ जानेवारीला अयोध्येकडे रवाना झाले.तत्पूर्वी खासदार नवनीत राणा मठाधिपतींचे दर्शन घेण्यासाठी आल्या होत्या.
श्री देवनाथ पिठाधिश्वर व श्रीराम जन्मभूमी निर्माण उच्चाधिकार समिती सदस्य प.पू.आचार्य जितेंद्रनाथ महाराज यांना रामलल्लाच्या अभिषेक व प्रतिष्ठापनेसाठी निमंत्रण आले आहे.अयोध्येला जाण्यापूर्वी गुरुजींनी नवनीत राणा यांना प्राचीन देवनाथ मठाची ओळख करून दिली.तर राम भक्तांना दिलेल्या भाषणात खासदार नवनीत राणा म्हणाल्या की, अयोध्येसाठी गुरुजींना निमंत्रित केले ही बाब संपूर्ण शहर व जिल्हावासीयांसाठी अभिमानास्पद असून एकप्रकारे हिंदू संप्रदायाचा हा अभिमान आहे आणि अश्यावेळी गुरुजींचे दर्शन घेण्याचे भाग्य आम्हाला लाभले आहे, असे खासदार नवनीत राणा यांनी यावेळी म्हटले.प.पू. जितेंद्रनाथ महाराज जाण्यापूर्वी खासदार नवनीत राणा यांनी गुरुजींना शाल आणि श्रीफळ देऊन आशीर्वाद घेतले.तर आचार्य जितेंद्रनाथ महाराजांनी नगरवासीयांना सांगितले की आपल्या सौभाग्यामुळे २२ तारखेला होणार्या रामलल्लाचा अभिषेक व प्रतिष्ठापनेला उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली. २२ तारखेला अयोध्येत होणार्या रामलल्लाच्या अभिषेक व प्रतिष्ठापनेच्या दिवशी संपूर्ण जगात दिवाळी साजरी करून रामलल्लाजींचे स्वागत करा.रामलल्लाजींचे स्वागत रॅली काढून संपूर्ण जग दिव्यांच्या रोषणाईने उजळून आपण केले पाहिजे.आम्ही तुमच्यासाठी अयोध्येतून भरपूर तीर्थप्रसाद घेऊन येऊ आणि येत्या २४ तारखेला ‘भूतो न भविष्यो’ महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.ज्या महारॅलीमध्ये आम्ही सहभागी होणार आहोत आणि शहरातील सर्व रहिवाशांना महारॅलीमध्ये सहभागी व्हायचे आहे असे अयोध्येला जाण्यापूर्वी प.पू. जितेंद्रनाथ महाराजांनी म्हटले.