
दैनिक चालु वार्ता
चिखलदरा प्रतिनिधी प्रवीण मुंडे..
माननीय पोलीस अधीक्षक साहेब अमरावती ग्रामीण श्री विशाली आनंद यांनी अमरावती ग्रामीण हद्दीत अवैध गुटखा विक्रीवर आळा बसवण्याकरिता पोलीस स्टेशन चिखलदरा येथील पोलीस अधिकारी व अमलदार यांना मार्गदर्शन करून कार्यवाही करणे बाबत सूचना निर्गमित केल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री आनंद पिदुरकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सब पोलीस निरीक्षक सचिन पाटील पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक सोनाळेकर अनिल कापडे सुमित सुरजुसे, पोलीस कॉन्स्टेबल वैभव ठाकरे, 28 5 2024 रोजी विभागीय गस्त दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीवरून ग्राम बिहारी येथे नाकाबंदी करून टाटा इंडिगो एम एच ४२ बि. १७०३ ची पाहणी केली असता सदर गाडीमध्ये विमल व हॉट चे कट्टे आढळून आले आरोपी एक अनिल मदन गायन राहणार धामणगाव गडी वय 23 वर्ष अतुल श्रीराम गिऱ्हे वय 32 वर्ष तालुका अचलपूर. जि अमरावती हॉट 8 कट्टे आणि विमल २ कट्टे व टाटा इंडिका गाडी असा एकूण २७६५०० मुद्देमाल जप्त करण्यात आला. व दोन्ही आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले.