
दै चालु वार्ता
प्रतिनिधी :बद्रीनारायण घुगे, पुणे /पिंपरी चिंचवड
पहिला पाऊस पडताच ग्रामीण भागासह शहरात वर्षभर टिकणारे कैरीचे लोणचे बनवण्यासाठी गृहिणींची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे घरोघरी लोणचे बनवण्यासाठी लागणाऱ्या खाराचा घमघमाट सुटला असून दोन ते तीन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे शेतकर्यांनी कैरी विक्रीसाठी आणल्याने सध्या बाजारात कैरीची आवक वाढली असली तरी कैरी मात्र यंदा महागली आहे. गेल्या वर्षी कैरी ४० ते ७० रुपये किलो होती, ती यंदा ६० ते १०० रुपये किलो आहे. कैरी फोडण्यासाठी १५ ते २० रुपये मोजावे लागत होते, मात्र आता ३० रुपये प्रतिकिलोने कैरी फोडून मिळत आहे.
उन्हाळ्यात बटाट्याचे पापड, नागली,
उडीद, पापड, कुरडया, शेवया, खारोड्या अशा वाळवणाचे पदार्थ बनवण्यासाठी गृहिणींची लगबग सुरू होती. तसेच आता
प्रतिक्रिया……
पंधरा वीस दिवसांपासून अधूनमधून दररोज वादळी वारा सुटत असल्याने परिपक्वते- पूर्वीच फळगळती होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसतआहे. त्यामुळे कैरीचेभाव वाढले आहे.
पांडुरंग राऊत कैरी विक्रते
जूनमध्ये पहिला पाऊस पडताच वर्षभर टिकणारे कैरीचे लोणचे बनविणे सुरू झाले आहे. जेवणाची चव वाढवणारा व ताटात
हमखास दिसणारा एक पदार्थ म्हणजे कैरीचे लोणचे. हे लोणचे जेवण रुचकर बनवते, परंतु
आता लोणच्याच्या कैऱ्या भाव खाताना दिसताहेत. दरवर्षीप्रमाणे घरोघरी लोणचे
बनवण्याची तयारी सुरू झाली असून मागणीमुळे कैरीचे भावही वाढल्याने
लोणच्यासाठी गावरान कैऱ्या आंबट झाल्याचे चित्र आहे.
मसाल्यांचे दर तेजीत
लोणच्यासाठी लागणारे शेंगदाणा तेल, गरम मसाले, मोहरी, हिंग, लवंग, हळद,
बडीशेप, धणे, दालचिनी, वेलची, मोहरी डाळीचे भाव कितीही वधारले तरी घरगुती लोणचे तयार केले जाते. त्यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागात लोणच्यासाठी लागणारा मसाला घेण्यासाठी बाजारात गर्दी होत आहे.
कैऱ्या फोडण्याचाही भाव वाढला
कैऱ्या खरेदीपासून तर लोणचे तयार होईपर्यंत यंदा मोठा खर्च
येत असल्याने गृहिणींचा घरगुती हिशेब कोलमडला आहे. लोणचे टाकण्यापूर्वी कैऱ्या फोडणे अनिवार्य असल्याने तीस रुपये किलोप्रमाणे कैरीच्या फोडी करून घ्याव्या लागत आहेत. त्यामुळे कैऱ्या फोडणाऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत.