
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनीधी – माधव गोटमवाड
इंडीयन आर्मी चे सैनिक शिवहार सुदाम कागणे यांच्या निवेदनाची प्रशासनाने घेतली दखल घेतली असून २२ जानेवारी रोजी प्रकाशित झालेल्या दैनिक चालु वार्ता या न्यूजपेपर मधील बातमीची दखल घेत कृषी अधिकाऱ्याने कृषी सेवा संचालकास रसायनिक खत विक्री ज्यादा दराने करू नये व दुकानात भाव फलक लावावेत अशा सूचना कंधार येथील कृषी अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
कृषि सेवा केंद्र कंधार येथील कृषि सेवा केंद्रावर युरिया खताबरोबर टॉनीक औषध कंपलसरी देत आहेत, जर औषध नाही घेतले तर, युरिया खत देत नाहित, दिला तर विशिष्ट माणसे पाहुण खत विक्री करत आहेत.असे निवेदन मा. तहसीलदार, तहसील कार्यालय कंधार व कृषी अधिकारी यांना इंडीयन आर्मी चे सैनिक शिवहार सुदाम कागणे यांनी दिले होते . तसेच या विषयावर गांभीर्याने दखल घ्यावी. व शेतकऱ्याला दिलासा द्यावा असेही त्यांनी निवेदनात उल्लेख केला होता . शेतकरी चिंताजनक झाला आहे, ज्या शेतकऱ्याला एका खताचे पोते घ्ययला पैसे नसतात, तो शेतकरी खतासोबत टॉनिक औषध कंपल्सरी घ्यायचे म्हणल्यास तो खरेदी करू शकत नाही, कारण त्याच्याकडे आर्थिक मंदी असते , शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव नाही, हे असेच चालत राहिल्यास शेतक-याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही या विषयावर तहसीलदार साहेबांनी गांभीर्याने विचार करावा व योग्य तो तोडगा काडावा, जर यावर तोडगा नाही निघाला , तर २६ जानेवारी पासून अमरण उपोषणास बसणार आहे असेही त्यांनी निवेदनात म्हटले होते.
दि.२२ जानेवारी रोजी दैनिक चालु वार्ता या न्यूजपेपर मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीची दाखल कृषी अधिकारी यांनी घेतली आहे व त्यांनी कंधार तालुक्यातील सर्व कृषी केंद्र धारकांना सुचित केले आहे की, युरिया खताच्या गोणी सोबत कोणत्याही प्रकारचा टॉनिक औषधी याची सक्ती करू नये तसेच रासायनिक खताची विक्री ज्यादा दराने करू नये दुकानातील भाव फलक अद्यावत ठेवण्यात यावे सदर प्रकार भविष्यात आढळून आल्यास आपल्या दुकानाच्या रासायनिक खताचा विक्री परवाण्यावर कायद्याप्रमाणे कारवाई करण्यासाठी परवाना अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी असे कृषी अधिकारी यांनी सांगितले .