
- दै.चालु वार्ता,
उदगीर, प्रतिनिधी
अविनाश देवकते
*लातूर/उदगीर :*
मॉडर्न पेंटॅथलॉन लेझर रन जागतिक स्पर्धेत भारताला एक रौप्य व एक कांस्यपदक मिळवून आपल्या भारतीय चमूने दिमाखदार कामगिरी केली आहे. वैयक्तिक, सांघिक आणि रिले प्रकारात स्पर्धांचा यात समावेश होता. मॉडर्न पेंटॅथलॉन फेडरेशन ऑफ इंडियातर्फे भारताच्या २२ खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. एमपीएफआयतर्फे अमरावती येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लेझर रन स्पर्धेतून या खेळाडूंची निवड करण्यात आली होती.
करण मिल्के (महाराष्ट्र), उदेश मजिक (गोवा), आदित्य आनंद (बिहार) यांनी कुमारांच्या सांघिक गटात भारताला रौप्य पदक मिळवून दिले. १९ वर्षाखालील गटात प्रिन्स कुमार (बिहार) आणि अन्नू कुमारी (झारखंड) यांनी मिश्र रिले स्पर्धेत भारतासाठी प्रथमच कांस्यपदक जिंकले बद्दल राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी या खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
या खेळातील बारकावे शिकवणारे मॉडर्न पेंटॅथलॉनचे भारतीय प्रशिक्षक वैभव चाफेकर यांचेही ही विशेष कौतुक करण्यात आले. आधुनिक पेंटॅथलॉन हा एक ऑलिम्पिक खेळ आहे आणि त्याचे उप-खेळ जगभरात खेळले जातात. हा खेळ अतिशय साहसी असून तो खेळाडूची शारीरिक आणि मानसिक चाचणी घेतो. त्यात पोहणे, इपी फेन्सिंग, अडथळे, धावणे आणि नेमबाजी यांचा समावेश आहे. बायथलॉन, ट्रायथलॉन आणि लेझर-रन हे या खेळाचे उप-खेळ आहेत.