
दै चालु वार्ता प्रतिनिधी पुणे/पिंपरी चिंचवड :बद्रीनारायण घुगे
आळंदी : श्री आळंदी धाम सेवा समितीच्या माध्यमातून आयोजित भव्य रक्तदान शिबिरास २७५ रक्तदात्यांनी सहभाग घेतला. तसेच ३२१ नेत्र तपासणी व २११नागरिकांनी आरोग्य व मोफत चष्मे वाटपचा लाभ घेतला. या शिबिराचे आयोजन श्री आळंदी धाम सेवा समितीचे अध्यक्ष राहुल चव्हाण यांच्या माध्यमातून करण्यात आले होते.
रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिराचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी योगी निरंजननाथ, नितीन गोरे, डि.डि.भोसले पा., डॉ.राम गावडे, प्रकाश वाडेकर, सतीष मोटे, ज्ञानेश्वर वीर, सचिन गिलबिले, महेश शेवकरी, प्रकाश कुऱ्हाडे, मोहन महाराज शिंदे, किरण येळवंडे, सचिन काळे, सुनील काटे, धनंजय पठारे, डॉ.सुनील वाघमारे, राजेश दिवटे, रमेश वहीले, आशिष गोगावले, वंदना आल्हाट, मनीषा थोरवे, संकेत वाघमारे राहुल थोरवे, योगेश पगडे, श्रध्दा थोरवे, मनोहर दिवाणे, अमित डफळ, साईनाथ ताम्हणे, नितीन ननवरे, किशोर देशपांडे,ज्ञानेश्वर गारकर,प्रदिप तळेकर,धनंजय मुंगसे,परसराम धनवटेअक्षय पाटील,अजय पवार,सुयोग भालेकर ज्ञानेश्वर घुंडरे,रोहिदास कदम उपस्थित होते.
या रक्तदान व आरोग्य शिबिरासाठी कमलेश हाॅस्पीपल, चव्हाण हाॅस्पीपल, धारा हाॅस्पीपल, सुर्या नेत्रालय तसेच वेदश्री तपोवन यांचे बहुमोल सहकार्य लाभले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर यांनी रक्तदानाबाबत मार्गदर्शन करून श्री आळंदी धाम सेवा समितीचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश राळे यांनी, प्रास्ताविक सचिन शिंदे यांनी केले. शशीकांत बाबर यांनी आभार मानले.