
पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन…
दिग्रस प्रतिनिधि सदानंद जाधव
दिग्रस विधानसभा मतदार संघातील गरजू दिव्यांग व्यक्तीसाठी मोफत तपासणी व प्रत्येक प्रकारच्या दिव्यांगासाठी निशुल्क कृत्रिम अवयव साहित्य वाटप पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य सेवा समिती यांच्यातर्फे करण्यात येणार आहे.
दिग्रस मतदार संघाचे आमदार मृद् व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांच्या ३० जून रोजी असलेल्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोफत भव्य दिव्यांग शिबिर व साहित्य वाटप करण्यात येत आहे. यामध्ये दिग्रस मतदारसंघातील गरजू दिव्यांगांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक आरोग्य सेवा समिती,यवतमाळ यांच्या वतीने करण्यात आले. दिव्यांगानी कृत्रिम अवयव व साहित्याचा लाभ घेण्यासाठी दिग्रस दारव्हा व नेर येथील मंत्री संजय राठोड यांचे जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधावा. दिग्रस, दारव्हा व नेर शहर व तालुक्यातील नागरिकांनी सुद्धा असे दिव्यांग त्यांच्या शहर गावांमध्ये असल्यास त्यांनाही माहिती द्यावी असेही सांगण्यात आले.