
दैनिक चालू वार्ता
शिवकुमार काळे नांदेड प्रतिनिधी
सविस्तर वृत्त…
दिनांक:-१७/०६/२०२४
पोलिस प्रशासन कार्यवाहीस तठस्त….जिल्ह्यात अनेक ठिकाणी अपराध आणि अपघाताचे प्रमाण वाढत चालले असून अपराध करणाऱ्याला कायद्याची भीती उरली नसल्याचे दिसून येत आहे. तसेच नियमाची पायामल्ली करत बिनधास्तपणे वाहने चालवून अपघात होण्याचे प्रमाण सुद्धा वाढत चालले आहे.
मोटरसायकल कायद्याचे पालन न करता काही बिनधास्तपणे कायदा तोडणाऱ्या नागरिकांकडून होत.असून निष्पाप लोकांचे बळी जात आहेत. तसेच मोटर सायकल चोरण्याचेही प्रमाण वाढत चालले आहे. जिल्ह्यात अवैध्य बनावटी दारू आणि अम्ली पदार्थ देखिल सर्रास पने विक्री करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. या प्रकरणात जिल्हा पोलीस प्रशासनाचे कारवाई सत्र चालू असून अद्याप पोलीस प्रशासनामार्फत प्रकरणाचे तपास संबंधित अधिकारी व कर्मचारी करत आहेत.अशी खालील दिलेल्या घटने पैकी संपूर्ण घटनेची माहिती.
इतवारा :- दिनांक 15.06.2024 रोजी 23.00 वा.ते दिनांक 16.06.2024 रोजी 01.00 वा. चे दरम्यान, मौकळया जागेत…
हारून बाग नांदेड येथे, यातील फिर्यादी यांचा भाऊ मयत नामे अब्दुल मन्सुर अब्दुल रहिम वय 37वर्षे रा. हारून बाग
नांदेड, यास अज्ञात आरोपीने अज्ञात कारणासाठी डोक्यात मागचे बाजुने कोणत्यातरी धारधार हत्याराने वार करून गंभीर
जखमी करुन त्याचा खुन केला. फिर्यादी अब्दुल नईम अब्दुल रहिम, वय 43 वर्ष, व्यवसाय कारागीर रा.ईस्लामपुर
नांदेड यानी दिलेल्या फिर्यादवरून पोस्टे इतवारा गुरन 20. /2024 कलम 302 भादवि कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन
तपास सपोनि / श्री चव्हाण, मो.नं. 9082426369 हे करीत आहेत…
2) मोटार सायकल चोरी :-
देगलुर : दिनांक 12.06.2024 रोजी 1.00 वा. ते दिनांक 13.06.2024 रोजी 07.15 वा. चे दरम्यान, फिर्यादीचे राहत
घर खाज्याबाबानगर देगलुर ता. देगलुर जि. नांदेड येथे, यातील फिर्यादीची यामाहा कंपनीची मोटार सायकल क्रं. एमएच-
26/ सिए-9916 किमती 1.25.000/-रूपयाची नमुद ठिकाणावरून कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली. वगैरे फिर्यार्द
मोहमद एहतेशाम मोहमद आस्लम, वय 28 वर्षे, व्यवसाय व्यापार रा. खाज्याबाबानगर देगलुर ता. देगलूर जि. नांदेड यांन
दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे देगलुर गुरनं 251/2024 कलम 379 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास
पोहेकों /2822 कनकवळे,हे करीत आहेत.
4अपघात :-
नादेड ग्रामेीण :- दिनांक 16.06.2024 रोजी 19.30 वा. चे सुमारास, उस्माननगर रोड गोविंद गार्डन गँरेज समोरील
रोडवर नांदेड येथे, यातील मयत नामे माधव राघोजी, वय 65 वर्षे, व्यवसाय कारागीर, रा. सिडको नांदेड है फियादीचे
मोटार सायकल वर बसुन घरी जात असताना यातील नमुद आरोपी ट्रक क्र एमएच-12 / एलटी-4236 च्या चालकाने
आपले ताब्यातील वाहन हयगय व निष्काळजी पणाणे चालवुन यातील मयतास पाठी मागुन जोराची धडक देवुन त्याचे
मरणास कारणीभुत आाला. वरगैरे फिर्यादी शिवाजी बालाजी पांचाळ, वय 48 वर्षे, व्यवसाय फर्निचर कामगार रा. वाल्मीक
नगर, नांदेड यांनी दिलेल्या फिययादवरुन पोस्टे नांदेड ग्रामीण गुरनं, 488/ 2024 कलम 279, 337,304(अ),427 भादवी
कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास पोउपनि / श्री चव्हाण, मो.नं. 9881429988 हे करीत आहेत.
5)प्रोव्हिबीशन :-
उमरा := दिनांक 16.06.2024 रोजी 19,00 वा. चे सुमारास, मौजे बोथी शिवार ता. उमरी जि. नांदेड येथे, यातील नमुद
आरोपीने बिना परवाना बेकायदेशिररित्या सिंधी दारू किंमती 1500/-रूपयाचा माल चोरटी वक्री करण्याचे उदेशाने
ताव्यात बाळगलेला मिळुन आला. वगेरे फिर्यादी पोहेकॉँ / 2164 सुरेश शंकरराव भालेराव, ने. पोस्टे उमरी यांनी दिलेल्या
फियादवरुन पोस्टे उमरी गुरनं 181/2024 कलम 65 (ई), मं. प्रो. कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास पोहिको /2018
वडजे, हे करीत आहेत.
जिल्हा माहिती अधिकारी पोलिस अधीक्षक कार्यालय नांदेड…