
अशोकराव उपाध्ये /कारंजा लाड
त्याग आणि बलिदानाचे प्रतीक असलेली ईद-उल-अज्हा बकरी ईद सोमवार दि.१७ जून रोजी बायपास नजीकच्या ईदगाह मैदानावर मुख्य नमाज अदा करून साजरी करण्यात आली. तसेच शहरातील विविध भागातील मशिदींमध्ये नमाज अदा करण्यात आली.
रंगीबेरंगी कपडे परिधान करून मुस्लिम नागरिकांनी नमाजासाठी सकाळी आठ वाजल्यापासूनच बायपास जवळील ईदगाह मैदानावर येण्यास सुरवात केली. व ईदगाह परिसरात सामूहिक नमाज सकाळी ९ वाजता अदा करण्यात आली. तत्पूर्वी शहरातील जामा मस्जिद, गवळीपुरा मस्जिद,अस्ताना मस्जिद, नगीना मस्जीद व शहरातील ईतर मशिदींमध्य सुद्धा मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली.यावेळी स्टेट बॅक ते बायपास परिसरात जाणारा रस्ता गर्दीने फुलून गेला होता.या परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. दरवर्षी प्रमाणे कश्यप बंधूच्या वतीने वझू करण्यासाठी व पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.ईदची नमाज काजी मोहम्मद इकबाल यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली.अतिशय उत्साहाच्या वातावरणात ईद साजरी करण्यात आली. याप्रसंगी शहर-ए-काझी रफिउल्ला काझी यांनी उपस्थितांना कायद्याचा पालन करावा असा उपदेश केला. मुस्लिम बांधवांना ईदची शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मो.यूसुफ पुंजानी, माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके, माजी गटनेता ॲड. फिरोज शेकुवाले, माजी सभापती सलीम गारवे, जाकिर शेख,अब्दुल एजाज, अब्दुल रशीद, जावेद्दोद्दीन शेख, सलीम प्यारेवाले, निसार खान, युनूस पहेलवान, चाँद शाह, युसुफ मौलाना, पत्रकार हमीद शेख,आरिफ पोपटे, चांद मुन्नीवाले, उस्मान खान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहाराध्यक्ष अजय श्रीवास, माजी उपाध्यक्ष महेबुब रेघीवाले, पिंटू भाई, नज्जा भाई, भोजा पहलवान, मोहम्मद गारवे, खन्नू पटेल, विनोद नंदागवळी, विनोद करोसे, नदीम राज, ॲड. सुभान खेतीवाले, कय्युम जट्टावाले, रहेमान भाई नंदावाले, प्रा. सी.पी. शेकुवाले, प्रा. बद्रोद्दीन कामनवाले, मोहम्मद शेकुवाले, शकील नौरंगाबादी, इस्माईल गारवे, रज्जाक खेतीवाले, आदिल शेकुवाले, हसन जानीवाले, राजू इंगोले,सदीम काझी, समीर पठान, मुजाहिद खान, नासिर भाई मच्छीवाले आदिंसह विविध पक्षाचे पदाधिकारी तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये या करिता जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे ,उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांनी अतिरिक्त पोलिस दल पाचरण करून चोख पोलिस बंदोबस्त तैनात होता