
जालना प्रतिनिधी
जालना -मुख्यमंत्री शिवरायांच्या रयतेचे नाही तर केवळ मराठ्यांचे आहेत अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली आहे. लक्ष्मण हाके म्हणाले, ५४ लाख नोंदी खाडाखोड करून केल्या जात आहेत. ८० टक्के मराठा कुणब्यामध्ये घातलेला आहे याची उत्तरे तायवडे यांनी द्यावीत तर मी उपोषण मागे घेईल. मुख्यमंत्री फक्त मराठा समाजाचे आहेत. कारण ते फक्त मराठा समाजाच्या आंदोलनाला वेळ देतात ओबीसीकडे ढुंकूनही पाहत नाहीत असे हाके म्हणाले.
ओबीसी आरक्षण संपवण्याचा शासन पुरस्कृत घाट आहे. मराठा मागासलेला असेल तर पुढारलेला समाज महाराष्ट्रात कोणता आहे हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं? असा सवाल देखी लक्ष्मण हाकेंनी केला होता.
ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस असून, आज त्यांची प्रकृती खालवली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. उच्च रक्तदाब आणि शुगर वाढली असून, त्यांना उपचारासाठी डॉक्टरांनी विनंती केली आहे. मात्र त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे या दोघांनाही सध्या उपचाराची गरज असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. लक्ष्मण हाके हे ओबीसी आर- क्षणाला धक्का लागणार नाही हे सरकारने लेखी द्यावं या मागणीवर ठाम आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. पाचव्या दिवशी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे या दोघांचीही तब्बेत
खालावली आहे. दरम्यान, डॉक्टरांच्या पथकाने आज या दोघांची तपासणी केली आहे. दोघांनाही उपचाराची गरज असून, त्यांनी उपचार घ्यावेत अशी विनंती डॉक्टरांनी केली
मुख्यमंत्री शिवरायांच्या रयतेचे नाही तर केवळ मराठ्यांचे आहेत अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली आहे. लक्ष्मण हाके म्हणाले, ५४ लाख नोंदी खाडाखोड करून केल्या जात आहेत. ८० टक्के मराठा कुणब्यामध्ये घातलेला आहे याची उत्तरे तायवडे यांनी द्यावीत तर मी उपोषण मागे घेईल. मुख्यमंत्री फक्त मराठा समाजाचे आहेत. कारण ते फक्त मराठा समाजाच्या आंदोलनाला वेळ देतात ओबीसीकडे ढुंकूनही पाहत नाहीत असे हाके म्हणाले. ओबीसी आरक्षण संपवण्याचा शासन पुरस्कृत घाट आहे. मराठा मागासलेला असेल तर पुढारलेला समाज महाराष्ट्रात कोणता आहे हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं ? असा सवाल देखी
लक्ष्मण हाकेंनी केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फक्त मराठ्यांच्या हिताची काळजी घेत आहेत असे लक्ष्मण हाके म्हणाले. तुमचे ४८ पैकी ३२ खासदार निवडून येत असतील तर तुम्ही मागास कसे? असा सवालही लक्ष्मण हाकेंनी यावेळी उपस्थित केला. जरांगे मॅनेज आंदोलन करतो १०० कोटीची भाषा बोलतो. मागासवर्गाच्या अन्नामध्ये माती कालवण्याचे काम जरांगे आणि मराठ्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत असल्याचे हाके म्हणाले..