
- दै.चालु वार्ता. प्रतिनिधी
अशोक कांबळे.
गारगोटी : प्रशासनाच्या सोयीसाठी राज्यात काही जिल्ह्याचे विभाजन करण्यात येणार असून त्यामुळे राज्यातील जिल्ह्यांच्या संख्येत आणखी वाढ होणार आहे.
1 जून 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्यावेळेस जिल्ह्यांची संख्या 26 होती. ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर हा 36 वा जिल्हा निर्माण झाला होता. त्यानंतर आणखी काही जिल्ह्याचे विभाजन होऊन 21 नवीन जिल्हे निर्माण होतील. त्यामुळे राज्यातील जिल्ह्यांची संख्या 57 च्या दरम्यान होईल. पुढील जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन जिल्हे असे तयार होतील:
नाशिक जिल्ह्याचे विभाजन करून *मालेगाव आणि कळवण* हे दोन जिल्हे तयार केले जाणार आहेत.
पालघर जिल्ह्याचे विभाजन करून *जव्हार* हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे.
अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून शिर्डी, *संगमनेर आणि श्रीरामपूर* हे तीन जिल्हे नव्याने तयार केले जाणार आहेत.
ठाणे जिल्ह्याचे आणखी विभाजन करण्याचा प्लॅन असून *मीरा-भाईंदर* आणि *कल्याण* या दोन जिल्ह्यांची निर्मिती करण्याचे प्रस्तावित आहे.
पुणे जिल्ह्यातून *शिवनेरी* जिल्हा तयार करण्याचे प्रस्तावित आहे.
रायगड मधून *महाड* जिल्हा तयार केला जाणार आहे.
सातारा जिल्ह्याचे विभाजन करून *मानदेश* हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून *मानगड* हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे.
बीडमधून *अंबाजोगाई* हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे.
लातूर मधून *उदगीर* हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे.
नांदेड मधून *किनवट* हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे.
जळगाव मधून *भुसावळ* हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे.
बुलढाणा मधून *खामगाव* आणि *अचलपूर* हे दोन नवीन जिल्हे तयार केले जाणार आहेत.
यवतमाळ मधून *पुसद* हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे.
भंडारा मधून *साकोली* हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे.
चंद्रपूर मधून *चिमूर* हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे.
गडचिरोली मधून *अहिरे* हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे.