
दै चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
बाजीराव गायकवाड
नांदेड/नायगाव:-व्हि.पी.के समूहाचे अध्यक्ष शेतकरी नेते मारोतराव कवळे गुरुजी यांनी बळेगाव ता.नायगाव येथे व्हि.पी.के उद्योग समूहाच्या वतीने ऊस विकास मेळाव्याला मार्गदर्शन केले.वाघलवाडा कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधवांचे एकरी उत्पादन वाढून आर्थिक विकास व्हावा यासाठी ऊस व्यवस्थापन आणि विविध शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी मार्गदर्शन करण्याकरिता आज बळेगाव येथे ऊस विकास व दुग्ध व्यवसाय मेळाव्यास उद्योग समूहाचे चेअरमन मा.श्री मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी गुरुजी समवेत प्रभाकर पाटील पुयड,(मा.सरपंच सिंधी),जेष्ठ शेषराव पा.बेलकर (माजी चेअरमन ) मोहन पा. बेलकर, साहेबराव पा.बेलकर,साईनाथ पा. बेलकर (चेअरमन), आनंदराव पा.बेलकर,अशोक पा. बेलकर, विठ्ठल पा.बेलकर, शंकरराव पा.बेलकर ,बालाजी पा.बेलकर (पोलीस पा),बालाजी रामराव पा. बेलकर ,बळवंत पा.बेलकर, रावसाहेब गुरुजी, पंडित पा. बेलकर ,दत्ता पाटील शिंदे,व तसेच कारखान्याचे ऊस विकास अधिकारी पडोवळे साहेब,वडजे साहेब,गजानन कदम,यांच्यासह असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.