
दै. चालु वार्ता
भोकर प्रतिनिधी
विजयकुमार चिंतावार
भोकर / नांदेड :-
तालुक्यातील मौजे हाळदा येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या बीज प्रित्यर्थ दि. ०९ मार्च २०२५ ते दि. १६ मार्च २०२५ दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून परमपूज्य बालयोगी स्वामी गजेंद्र चैतन्यजी महाराज यांच्या ओजस्वी वाणीतून दुपारी १ ते ५ या वेळेत संगीत श्रीमद् देवी भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा संपन्न होणार आहे. तसेच दररोज रात्री खालील मान्यवर संतांची हरिकीर्तने होणार आहेत.
या हरिनाम सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम खालील प्रमाणे राहणार आहेत. सकाळी ४ ते ६ काकडा आरती व भजन, ७ ते १० श्री संत तुकाराम महाराज अभंग गाथा पारायण, दुपारी १ ते ५ श्रीमद् देवी भागवत कथा ज्ञान यज्ञ, सायंकाळी ६ ते ७:३० हरिपाठ व रात्री ८:३० ते ११ खालील मान्यवर संतांची हरिकीर्तने होणार आहेत. दि. ९ मार्च ह.भ.प. श्रीराम महाराज कुरे शिवनीकर, दि. १० मार्च ह.भ.प. संतोष महाराज अभंगराव पंढरपूरकर, दि. ११ मार्च ह.भ.प. सच्चिदानंद गुरू यदुबन महंत महाराज सरेगाव, दि. १२ मार्च ह.भ.प. भागवताचार्य पंजाबराव महाराज चालगणीकर, दि. १३ मार्च ह.भ.प. नरसिंग महाराज केरुरकर, दि. १४ मार्च
ह.भ.प. कल्याण महाराज वारे मुरुंबेकर दि. १५ मार्च गुरुवर्य ह.भ.प. माधवराव महाराज बोरगडीकर यांची हरिकीर्तने होणार आहेत. दि. १६ मार्च २०२५ रोज रविवारी सकाळी ९ ते १२ परमपूज्य बालयोगी स्वामी गजेंद्र चैतन्यजी महाराज यांचे काल्याचे किर्तन व दुपारी १२ वाजता गुलाल उधळून श्री संत तुकाराम महाराज बीज उत्सव सोहळा व त्यानंतर भव्य महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. तरी या सर्व धार्मिक कार्यक्रमाचा परिसरातील सर्व भाविक भक्तांनी आवर्जून लाभ घ्यावा असे आवाहन समस्त हाळदा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.