
लोहा / प्रतिनिधी
गोविंद पवार.
लो ह्यात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक एकनाथ दादा पवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात शिवसेनेचा ५८ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
शिवसेना उबाठा चे लोहा तालुकाप्रमुख चंद्रकांत पाटील क्षीरसागर यांच्या हस्ते प्रथम शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर भगवा झेंडा फडकविण्यात आला.
यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख चंद्रकांत पाटील क्षीरसागर, बालाजी पाटील पवार,रहिम पटेल, सरपंच गजानन पाटील मोरे, राम पाटील पवार, मुरली पाटील, रूद्रा पाटील भोस्कर,अमर टेलर आदी उपस्थित होते.