
अशोकराव उपाध्ये / कारंजा लाड तालुक्यातील ग्राम काजळेश्वर येथील उमेदच्या महीला बचत गट समूहानी महीलांना सक्षम करण्याकरिता दि. २० जून २४ रोजी काजळेश्वर येथे समूहातील महिलांनी एकत्रित बियाणे व खते खरेदी करण्याकरिता बचत गट प्रमुख सौ रेखा डिगांबर लांडे यांच्या पुढाकार उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतगत महिलांना एकत्रित बियाणे, खते खरेदी केले . गटातील महिलांनी आपल्या परीवाराला आपण बचत गटा मध्ये असल्याने १०० ते २०० रु प्रती बॅग याप्रमाणे फायदा होत असल्याचे सौ रेखा लांडे यांनी सांगीतले. देवकी कृषी केंद्र काजळेश्वर येथून ५० एकर साठी बी बीयाणे खत एकत्रीत खरेदी केले . यामधे सोयाबीन तूर मुंग उडीत कपाशी या सोबत खताची खरेदी केली .एच डि एफ सी . बँकेमार्फत अंतर्गत कर्ज सखी व निशीगंधा महीला ग्राम संघा मधून सि आय एफ अंतर्गत एकत्रीत बियाणे खरेदीला कर्ज घेतले . याकरीता बचत गटाच्या महिलांनी उत्स्फूर्त प्रतीसाद दिला असल्याची माहीती लेखापाल डिगांबर लांडे यांनी दिली .