
अंबड पंचायत समिती मनरेगा विभागाची चौकशी करण्याची मागणी…
दैनिक चालु वार्ता अंबड
प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंके जालना (अंबड)
मनरेगा सिंचन विहीर खोदण्याच्या निमित्ताने बारकाईच्या प्रयत्नात असलेल्या अंबड तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व दलालाची चांगभलं होताना दिसून येत आहे असुन करून सिंचन विहिरीचा लाभ देण्याचे आमिष दाखवून अनेक भोळ्या भाबड्या व गोरगरिबांकडून 25 ते 30 हजार रुपयाची दमदार वसुली केल्या जात असल्याची खळबळजनक बाब अंबड तालुक्यातील अनेक गावातून पुढे येत आहे. राज्यातील आसमान संकट पावसामुळे अनेक शेतकऱ्यांना सरकारने शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याचा पंचायत समितीचे सिचंन विहिरी योजना लागू केल्या आहे. शेतकऱ्यांना त्याचे शेतात विहीर खोदण्यासाठी आर्थिक सहाय्य देणे हे मागेल त्याला विहीर योजनेचा प्रथम उद्दिष्ट आहे ज्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पुरेशी सिंचन सुविधा उपलब्ध होतील यामुळे सिंचन विहीर योजना अस्तित्वात आणल्या आहेत त्यानुसार महाराष्ट्रात अजून 3 लाख 84 हजार 500 विहिरी खोदणे शक्य असल्याची भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेन म्हटल आहे. अंबड तालुक्यात सद्यस्थितीत एका गावाला अंदाजे 10 ते 15 शेतकऱ्यांचा लाभ मिळू शकतो, विशेष म्हणजे शासनाकडून विहिरीचे अनुदान वाढ झाल्यामुळे तीन लाख ऐवजी आता चार लाख रुपये मिळणार असल्याची बाबीचा पुरेपूर शेतकऱ्यांकडून लाभ मिळवून देण्यासाठी तब्बल 25 ते 30 हजार रुपये दांडगी वसुली करत असल्याचे वास्तव नाव न सांगणारे अटीवर लाभार्थ्याकडून सगळ्यांना येत आहे. दलाला मंडळीला प्रो देता लाभार्थ्याकडून पैसे उकळण्याचा गोरखा धंदा सुरू असल्याचे वास्तव्य आहे त्यामुळे योग्य ती गजू शेतकऱ्यांना लाभापासून वंचित राहून अनेक बुंगोस लाभार्थ्यांना लाभ मिळवून हा खऱ्या व गजू शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्यामुळे गरिबावर अन्याय होणार असल्याचे शक्य न करता येत नाही या गंभीर बाबीकडे पंचायत समिती स्तरावरून लक्ष देण्याची गरज असून अंबड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी व्ही ,व्ही ,जमदाडे यांच्याकडून शेतकऱ्याची लूट सुरू आहे या मागे पंचायत समिती वरिष्ठ अधिकारी सहभाग असू शकतो याची चौकशी समिती नेमून प्रत्येकी लाभार्थ्यापर्यंत जाऊन योग्य चौकशी करावा व शेतकऱ्यांची लूट मार करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात यावी नसता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सदरील कर्मचाऱ्यावर मनसे स्टाईल कार्यवाही करेल याची नोंद घ्यावी असे मनसेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले…