
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी नांदेड दक्षिण गोविंद मोरे
नांदेड- कंधार तालुक्यातील नेहरूनगर येथे असलेल्या वसंतराव नाईक ग्रामीण कृषि महाविद्यालयाच्या वतीने सोनखेड येथे सोमवारी माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांचा जयंती दिन कृषि दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी कृषि दुतांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
लोहा तालुक्यातील सोनखेड येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ग्रामीण जागृकता कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत शेतकऱ्यांना मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धती, बदलते हवामान, किड रोग व्यवस्थापन, सुक्ष्म सिंचन पद्धती, सेंद्रिय शेती बद्दल तसेच शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना संदर्भातील मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या कृषि दुतांनी वृक्ष लागवड आणि जनावरांचे लसीकरणाचे आयोजन केले. वसंतराव नाईक ग्रामीण कृषि महाविद्यालयाचे प्रा. डॉ. डी. जी. मोरे सर, प्रा. बी. एस. मोरे सर, प्रा. बसवंते सर, प्रा. बंडेवार सर, यांच्या मार्गर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चतुर्थ वर्षातील विद्यार्थी कृषिदूत केंद्रे निखिल, खाकरे प्रविण, खताळ प्रसाद, लंघे कृष्णा, लोहकरे सम्यक, मादस्तवार प्रशांत, यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला सरपंच सुनिल मोरे, ज्ञानोबा मोरे, शिवरामजी मोरे, शंकरराव गौड ( मु. अ. शिवाजी शाळा ), बालाजी मोरे ( मु. अ. नांदेड), माधवराव मोरे, आनंदरावजी मोरे, भास्कर खिल्लारे ( ग्रा. पं. सदस्य ), माणिक मोरे ( ग्रा. पं. सदस्य ), बाळासाहेब मोरे व तसेच जि. प. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. फुलारी मॅडम, व कन्या शाळेच्या मु. अ. सौ. नरवाडे, सौ. कविता मुदखेडे मॅडम, चिद्रावार सर आणि शिक्षकवृंद, ग्रामस्थ व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.