
दै चालु वार्ता प्रतिनिधी पुणे / पिंपरी चिंचवड बद्रीनारायण घुगे
नुकतेच राज्य शासनाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी लाडकी बहीण ही योजना जाहीर केलेली गावोगावी राबवून जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी खेड आळंदी पंचक्रोशी व तालुका पातळीवर , राहुल थोरवे चहोली मरकळ, कुरुळी जिल्हा परिषद विभाग प्रमुख, शिवसेना शहर प्रमुख आळंदी राहुल चव्हाण यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे राहुल चव्हाण यांनी घोषित केले. गाव तालुका आळंदी शहर पातळीवर ही योजना दोन्ही संघटनेच्या माध्यमातून महिलांना योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे महसूल विभागाकडून सहज उपलब्ध होण्याकरिता पक्षाचे संघटनेचे पदाधिकारी युवक कार्यकर्ते गावोगावी सक्रिय असून जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी याचा लाभ कसा होईल यासाठी प्रयत्न केले जातील. महिला लाभार्थी ही 21 ते 60 वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत करिता त्या निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे राहुल चव्हाण
यांनी सांगितले असुन कागदपत्रे साठी धावपळ न करता गावे गावी जाऊन ग्रामपंचायत पातळीवर जाऊन या योजनेचा अमावल बजावली करणार आहे