
भारत आणि चीन…
भारत आणि अमेरिकेतील संबंध गेल्या काही काळापासून ताणलेले आहेत. अशातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर पुन्हा गंभीर आरोप केला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत (UNGA) भाषण करताना ट्रम्प यांनी भारत आणि चीनवर युक्रेन युद्धाला अर्थसहाय्य दिल्याचा ठपका ठेवला आहे.
ट्रम्प म्हणाले की, ‘रशियाचे तेल खरेदी करून चीन आणि भारत हे युक्रेनसोबत सुरु असलेल्या युद्धात रशियाला पाठिंबा देत आहेत.’ याआधीही ट्रम्प यांनी असाच आरोप केला होता.
ट्रम्प नेमकं काय म्हणाले?
डोनाल्ड यांनी आपल्या भाषणात म्हटले की, ‘चीन आणि भारत हे देश रशियन तेल खरेदी करून या युद्धाचे मुख्य वित्तपुरवठादार बनले आहेत. तसेच नाटो देशांनीही रशियन ऊर्जा आणि ऊर्जा उत्पादनांवर कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत. याबद्दल मी नाराज आहे. ते स्वतःविरुद्ध युद्धाला निधी देत आहेत. जर रशिया तडजोड करण्यास तयार नसेल, तर अमेरिका युद्ध संपवण्यासाठी कठोर शुल्क लादण्यास पूर्णपणे तयार आहे, यामुळे रक्तपात थांबेल. मला विश्वास आहे की ते लवकरच होईल. मात्र हे शुल्क लादण्यासाठी युरोपीय देशांना काही अचूक उपाय स्वीकारावे लागतील.
ट्रम्प यांची संयुक्त राष्ट्रांवरही टीका
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या भाषणात संयुक्त राष्ट्रांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर आणि 150 हून अधिक जागतिक नेत्यांसमोर संयुक्त राष्ट्रांवरही टीका केला आहे. ट्रम्प म्हणाले की, मी थांबवलेल्या विविध युद्धांबद्दल संयुक्त राष्ट्रांनी माझ्याशी संपर्क साधला नाही. मी नेहमीच म्हटले आहे की संयुक्त राष्ट्रांकडे प्रचंड क्षमता आहे, परंतु ती क्षमता नाही. सध्या ते फक्त कडक शब्दात पत्र लिहितात आणि नंतर त्याचे पालन करत नाहीत. त्यामुळे ते शब्द पोकळ ठरतातस आणि पोकळ शब्द युद्ध सोडवू शकत नाही.’
अमेरिकेचे कौतुक
ट्रम्प यांनी आपल्या भाषणात पुढे बोलताना अमेरिकेचे कौतुक केले आहे. त्यांनी म्हटले की, ‘अमेरिका हा जगातील सर्वात उष्ण देश, इतर कोणताही देश त्याच्या जवळही येत नाही. अमेरिका व्यवसाय करण्यासाठी जगातील सर्वोत्तम देश आहे. आता अमेरिकेची अर्थव्यवस्था आता माझ्या पहिल्या कार्यकाळापेक्षा मोठी आणि चांगली आहे.