
अशोकराव उपाध्ये /कारंजा लाड
वसंतराव नाईक प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा दापुरा येथे आज दिनांक 1 जुलै 2024 ला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची जयंती साजरी करण्यात आली .याप्रसंगी गावातील माजी सरपंच नामदेवजी पवार तर प्रमुख पाहुणे मानोरा पंचायत समितीचे माजी सदस्य मधुसूदनजी राठोड हे उपस्थीत होते या कार्यक्रमाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले याप्रसंगी शाळेतील मुख्याध्यापक एस आर देशपांडे यांनी स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांच्या जीवन कार्याचा उजाळा दिला .शाळेतील ज्येष्ठ शिक्षक चव्हाण यांनी प्रास्तावीक केले . सूत्रसंचालन शएस आर जाधव सर यांनी आभार चौधरी सर यांनी मानलेत .शेवटी शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.