
- दैनिक चालु वार्ता
बीड जिल्हा प्रतिनिधी।किशोर फड
बीड/अंबाजोगाई
मराठवाड्यातील पहिला भव्य असा रिंगण सोहळा
येणाऱ्या सर्व दिंड्या एकत्र करण्याचा प्रयत्न करणार- नंदकिशोर (काकाजी)मुंदडा
डोळ्याचे पारणे फेडणारा सोहळा -दिलीप (भाऊ) गीत्ते
या सोहळ्यात एकात्मतेचे दर्शन -दिलीप दादा सांगळे
मराठवाड्याची शिक्षणाची पंढरी म्हणून संबोधित केलेली अंबाजोगाई,सुसंस्कृत म्हणून प्रसिद्ध असलेल्या अंबाजोगाई शहरात
विठ्ठल नामाच्या जयघोषामध्ये बीड जिल्ह्यातल्या आंबेजोगाई शहरांमध्ये योगेश्वरी महाविद्यालयाच्या मैदानावरती मराठवाड्यातल्या पहिला भव्य असा रिंगण सोहळा संत श्रेष्ठ नरसी नामदेव आणि गंगाखेड इथल्या संत जनाबाई यांच्या दिंडी एकत्रित भव्य असा रिंगण सोहळा अंबाजोगाई येथे योगेश्वरी क्रिडा प्रांगणात झाला.डोळ्यांच पारण फेडणारा हा अश्व रिंगण सोहळा पार पडला. व त्या सोहळयाचे प्रसिद्ध छायाचित्रकार सचिन सोमेश यांनी आपल्या शैलीत संपूर्ण विंहंगमय दृश्य चित्रबद्ध केले.अंबाजोगाई पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी लहानांपासून वरिष्ठांपर्यंत सर्वांनी दर्शनासाठी व सोहळा पाहण्यासाठी गर्दी केलेली होती पोलीस प्रशासनाचे सुसज्ज नियोजन असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता सोहळा अत्यंत सुंदर असा पार पडला .महिलांची गर्दी लक्षणीय होती भाविकांनी गर्दी केली होती रिंगण सोहळात मैदानावर वारकरी पाऊल ,फुगड्या, कुस्त्या ,हुतुतू असे विविध खेळ खेळत टाळ मृदुंगाच्या आणि अभंगाच्या तालावर खेळ खेळत टाळ मृदुंगाच्या आणि अभंगाच्या तालावरती वारकरी या खेळामध्ये दंग झाली होती.