
दैनिक चालू वार्ता
कळंब/ प्रतिनिधी
समीर मुल्ला
धाराशिव/ कळंब
यावर्षी पाऊस चांगल्या प्रमाणात झाल्यामुळे सगळ्याच्या मनात आनंद निर्माण झाला आहे. गेली अनेक वर्ष दुष्काळाचा सामना करावा लागला आहे. यामागचं कारण म्हणजे अति प्रमाणात झालेली वृक्षतोड, ही भर भरून काढण्याची जबाबदारी आपलीच आहे या विचाराने प्रेरित झालेल्या नवनियुक्त शालेय व्यवस्थापन च्या पुढाकारातून स्वच्छता व 225 झाडे लावण्याचा उपक्रम मस्सा खं जि प प्रशालेत राबविण्यात आला आहे.
कळंब तालुक्यातील मस्सा (खं) येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात शनिवार (दि.६) रोजी विविध प्रकारच्या फळे व फुले अशी दोनशे पंचेवीस झाडे लावण्याचा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी शाळेच्या पहिली ते दहावी च्या विध्यार्थ्यांनी गावातून वृक्षदिंडी काडून, झाडे लावा, झाडे जगवा अशा घोषणा देत जणजागरण करण्यात आले.
यावेळी कळंब गटशिक्षण विस्तार अधिकारी सुशील फुलारी,सरपंच त्रिंबक कचरे,ग्रामविकास अधिकारी ऐ बी वाघमारे, ग्रापं सदस्य सतीश शिंदे, माझी तंटामुक्ती अध्यक्ष ग्रा प सदस्य विक्रम वरपे, ग्रामपंचायत सदस्य जालिंदर किलचे , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप थोरात, प्राथमिकचे दत्तात्रय शेळके,माजी अध्यक्ष संभाजी वरपे, मुख्याध्यापिका साजेदा मनुर,तुकाराम थोरात,बाळासाहेब वरपे ,अविनाश जाधव, बब्रुवान गोरे, यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .
यावेळी शिक्षक किशोर गायकवाड,दशरथ मुंडे, दीपक गाडे,श्रीमती मायावती पवार,सुवर्णमाला डिकले, प्रीती गाठे,प्राथमिकचे मुख्याध्यापक सुभाष नांदुरे, विवेकानंद मिटकरी,रमेश वाघमारे, बालाजी यादव,श्रीमती वैशाली बांगर,संगीता भिसे,वृषाली तांबे, विध्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
(या झाडाची केली लागवड नारळ,जास्वंद,लिंबोणी,बादाम, आंबा,काजु,मोसंबी गुलमोहर,सप्तपर्णी,अशोक,चिकु,बदाम अशा विविध प्रजातींची साधारण 200 झाडे लावण्यात आली.)
यांनी घेतला पुढाकार….
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप थोरात,प्राथमिक शाळासमिती अध्यक्ष दत्तात्रय शेळके,सदस्य रामरतन आवटे,गणेश वरपे,अमोल शिंगटे, प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षक यांनी पुढाकार घेऊन यासाठी लागणारी रक्कम वर्गणी करुन झाडे जतन करण्यासाठी बोअर वेल व ड्रीपची व्यवस्था करत हा उपक्रम राबवला आहे.
(झाडे जतन करणाराला बक्षीस.)
शालेय व्यवसस्थापन समितीचे माझी अध्यक्ष संभाजी वरपे यांनी वर्ष भर झाडे सांभाळ करणाऱ्या विद्यार्थ्याला पहिले बक्षीस एक हजार पाचशे , दुसरे एक हजार, तिसरे पाचशे रुपये रक्कम ठेवण्यात आली आहे.हे बक्षीस 15 ऑगस्ट 2025 रोजी देण्यात येणार आहे.