
दैनिक चालू वार्ता
उप संपादक धाराशिव
धाराशिव/भूमःदिवसेंन-दिवस शैक्षणिक क्षेत्रात स्पर्धा वाढत चालली असुन इलेक्ट्रॉनिक मोबाईल द्वारे शिक्षण देण्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून यामुळे शैक्षणिक क्षेत्रातील गुणवत्ता वाढली असली तरी देखील विद्यार्थ्यांच्या मनामध्ये व्यवहारिक ज्ञान , संस्कार आणि संस्कृतीचे जतन केले पाहिजे असे आवाहन शालेय व्यवस्थापन शिक्षण समिती उपाध्यक्ष प्रल्हाद आडागळे यांनी केले आहे
भूम शहरातील नामांकित असलेल्या गुरुदेव हायस्कूल प्राथमिक विद्यामंदीर या ठिकाणी दि ८ रोजी पालक मेळव्याचे आयोजन करण्यात होते यावेळी शाळेतील वेगवेगळ्या अनेक विषयावर चर्चा आहे करण्यात आली शाळेच्या ग्राउंड मध्ये महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीचे विद्युत खांब उभे असल्याने यामुळे विद्यार्थ्यांना धोका होऊ शकतो ते काढण्यासाठीही आपण प्रयत्न करत असल्याचे सांगितले तसेच सांस्कृतिक कार्यक्रम पिण्याचे पाणी लाईट व इतर सुविधा यावर ही पालक आणि शिक्षक व समितीमध्ये चर्चा झाली यावेळी पालक मेळाव्यास कार्यक्रमाचे अध्यक्ष मा . श्री.प्रल्हाद आडागळे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष उपस्थित होते गुरुदेव दत्त प्राथमिक विद्यामंदिर, भूम व प्रमुख पाहुणे म्हणून सत्येंद्रजी मस्कर, संचालक, लोकसेवा शिक्षण प्रसारक मंडळ, भूम तर प्रमुख उपस्थिती मान्यवर पालक म्हणून श्री.विजय माळी ‘श्री अरुण देशमुख , श्री विशाल जाधव , सौ. शितल गिलबिले ,सौ. भारती सोन्ने ,सौ.डांगे मॅडम , सौ. सिताताई साठे .मुख्याध्यापिका अंजना मुंढे , पालक मेळावा विभाग प्रमुख श्रीमती राखी दुरुगकर मॅडम, सहायक श्री.भूपाल सिंह गायकवाड , सर्व वर्ग शिक्षक शिक्षिका,पालक उपस्थित होते