
दैनिक चालू वार्ता
उप संपादक धाराशिव
धाराशिव/भूम:-डॉ राहुल भिमराव घुले आरोग्य मित्र परिवाराची बैठक भूम येथील संपर्क कार्यालयात पार पडली.येथील संपर्क कार्यालयात डॉ राहुल घुले आरोग्य मित्र परिवाराचे भूम परंडा वाशी येथील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.ऑपरेशन,काठी वाटप,डी. पि वाहतूक या आरोग्य मित्र परिवाराच्या वतीने चालू असलेल्या योजनाची जास्तीत जास्त गरजु व्यक्तींना उपयोग व्हावा यासाठी माहिती पोहोचवा असे डॉ.राहुल घुले सांगितले.त्यावेळी त्यांच्या गावातील समस्या जाणून घेतल्या व निवारण करण्याचा प्रयत्न केला.यावेळी असंख्य आरोग्य मित्रपरिवार उपस्थित होता.