- दैनिक चालू वार्ता
उप संपादक धाराशिव
धाराशिव/भुम :-तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना,श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना,इंदिरा गांधी राष्ट्रीय वृ.नि. वेतन योजनांचे लाभार्थ्यांनी आपला मोबाईल क्रमांक आधारक्रमांकाशी लिंक करून घेण्याचे आवाहन एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे तहसीलदार जयवंत पाटील यांनी केले आहे. विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी प्रणालीद्वारे करण्याचे शासनाचे निर्देश आहेत.जिल्हाधिकारी,धाराशिव याचे आदेशा नुसार विशेष सहाय्य योजनातंर्गत राबविण्यात येणाऱ्या सर्व पात्र लाभार्थी यानी दि.१५ सप्टेंबर पर्यंत आपला मोबाईल नंबर आधार क्रमांकाशी लिंक करून घेवून महा डीबीटी प्रणालीवर आपले आधार व्हेरीफिकेशन (डेमोग्राफी) करून घेण्यासाठी तहसील कार्यालयास भेट देवून डेमोग्राफी पुर्ण करून घेण्यासंदर्भात सांगितले आहे.