दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनीधी – माधव गोटमवाड
‘सुकलेल्या भाकरीला पाण्यासंग खाऊ गड्या, कितीही संकटं येऊ दे पण इमानदार राहू गड्या’ या उक्तीप्रमाणे काही माणसं अशी असतात, की त्यांच्यामुळे त्यांच्या पदाला शोभा येते. एस. टी महामंडळात ‘वाहक’ असणे ही एक साधारण बाब.
परंतु या पदावर काम करताना त्याला न्याय देऊन आपल्या कर्तृत्वाने विशिष्ट उंची गाठणे हे काही प्रत्येकाला शक्य होत नाही.
संगमवाडी गावात अतिशय प्रतिकूल कौटुंबिक परिस्थिती असलेल्या कुटुंबात जन्म घेऊन दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर बस वाहकाची परीक्षा उत्तीर्ण होऊन संभाजी घुगे हे सध्या कंधार येथील बस डेपोमध्ये वाहक म्हणून कार्यरत आहेत. नेहमीप्रमाणे कर्तव्यावर असताना कंधार आगाराची बस राणीसावरगाव ते लोहा कडे परत येण्यास निघाली.
लहान पनापासूनच इमानदार असलेले नेहमी गोरगरीब जनतेची सेवा करणारे कोणत्याही कार्यातून असो असे कंधार आगाराचे वाहक संभाजी घुगे व चालक जाधव हे कंधार आगाराची बस क्रमांक एम एच २० बी एल १७३८ हि राणीसावरगाव ते लोहा जात असताना बस मध्ये अनेक प्रवाशी होते बस लोहा येथे आल्यावर वाहक संभाजी घुगे यांना शिट च्या खाली एक मोबाईल भेटला त्यांनी व्हॉट्सॲप ग्रुपच्या साह्याने मॅसेज दिला व ऍड मोबाईल नंबर वरुन माहिती दिली हा मोबाईल बाबुराव हाके लेंडेगाव ता. पालम जिल्हा परभणी यांचा आहे समजले त्यांना बोलवून वाहक व चालक यांनी परत केला कंधार आगार चे वाहक संभाजी बापुराव घुगे व चालक रंगनाथ जाधव यांनी यांच्या अगोदर पण प्रवाशांचे अनेक असे विसरलेले सामान परत केले आहेत वाहक व चालक यांचे कंधार आगारातील आगार प्रमुख यांनी दोघांचे पण स्वागत केले.
संभाजी घुगे व रंगनाथ जाधव यांनी दाखविलेल्या या प्रामाणिकपणाबद्दल त्यांच्यासह एस. टी. महामंडळाची प्रतिमा उंचावली आहे.
