
पुणे:विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत. त्याच वेळी मराठा समाजाचेही काही उमेदवारी मैदानात उतरणार आहेत. याबाबत मनोज जरांगे पाटील यांनी नुकतीच घोषणाही केली आहे.
एका मतदार संघात समाजाचे अनेक उमेदवार इच्छुक आहेत. अशा वेळी एका मतदार संघात एकच उमेदवार असला पाहीजे अशी जरांगे यांची भूमीका आहे. त्या पार्श्वभूमीवर जरांनी इच्छुकांची बैठक बोलावली होती. मात्र त्याच वेळी जरांगेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी ऑनलाईन देण्यात आली आहे. त्यानंतर अंतरवाली सराटीत खळबळ उडाली आहे.
मराठा समाज विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. त्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. एका मतदार संघात अनेक जण इच्छुक असल्याने मनोज जरांगे पाटील यांनी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत त्यांनी प्रत्येक मतदार संघात एकच उमेदवार कसा देता येईल यावर चर्चा करण्यात आली. त्यामुळे कोण उमेदवार असणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. मात्र त्याच वेळी एक खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. मनोज जरांगे यांना थेट जीवे मारण्याची धमकी आली. ही धमकी ऑनलाईन देण्यात आली आहे. एका युट्यूब चॅनेलच्या मेसेज बॉक्समध्ये मेसेज द्वारे ही धमकी देण्यात आली आहे.
आमचा एक मेंबर तुमच्यामध्ये घुसून पाटलाचा गेम करणार. आता दहा मिनिटात पाटलाचा कार्यक्रम होणार अशी धमकी देण्यात आली होती. ही धमकी बजाज बिष्णोई याच्या अकांऊटवरून देण्यात आली होती. ही बाब लक्षात आल्यानंतर पोलिस अलर्ट झाले आहेत. जरांगे यांची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. शिवाय जरांगे यांना भेटण्यासाठी जे लोक येत आहेत त्यांची तपासणी केल्यानंतरच त्यांना भेटीसाठी पाठवले जात आहे. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर अशी धमकी आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
जरांगे यांनी या आधी ही आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले होते. शिवाय त्यांना धमक्याही आल्या होत्या. त्यामुळे त्यांना सुरक्षाही देण्यात आली आहे. निवडणूक असताना आता त्यांना पुन्हा धमकी आली आहे. त्यामुळे पोलिसांनही अधिक काळजी घेण्याच्या दृष्टीने पावलं उचलली आहेत. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे हे आग्रही आहे. शिवाय त्यांना आता काही मतदार संघात मराठा समाजाचे उमेदवार उतरवण्याचा निर्णयही घेतला आहे. मराठा समाजाचे मोठे समर्थन जरांगे यांच्या पाठीमागे आहे. त्यामुळे जरांगे यांना ही धमकी कोणी दिली आहे याचा शोध आता पोलिस घेत आहेत.